एकल महिलांच्या प्रश्नासाठी समिती स्थापन

दिलीप लोखंडे 

टाकळीभान प्रतिनिधी- एकल महिलांच्या प्रश्नांवर धोरण
ठरवण्यासाठी राज्य सरकारने मसुदा समिती स्थापन केली आहे. एकल महिलांना सक्षम करण्यासाठी स्वतंत्र धोरण करणारे महाराष्ट्र देशातील पहिले राज्य ठरणार आहे. महिला बालकल्याण आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या या समितीत सर्व विभागांचे वरिष्ठ अधिकारी असून, साऊ एकल महिला समितीचे राज्य निमंत्रक हेरंब कुलकर्णी यांचाही या समितीत समावेश आहे, अशी माहिती जिल्हाध्यक्ष अशोक कुटे यांनी दिली.


मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पाच्या भाषणात एकल महिलांसाठी लवकरच धोरण जाहीर करण्यात येईल, अशी घोषणा केली होती. त्या घोषणेच्या अंमलबजावणीची साऊ एकल महिला समितीने विनंती केल्यावर मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव श्रीधर परदेशी यांनी एकल महिला प्रश्नावर दोन बैठका घेतल्या व मसुदा समिती स्थापन करण्याचे महिला बालकल्याण विभागाला सूचित केले. महिला बालकल्याण मंत्री आदिती तटकरे व राज्यमंत्री मेघना बोर्डीकर या दोघींनीही त्यानंतर एकल महिला धोरण विषयावर चर्चा करण्यासाठी बैठका घेऊन समिती स्थापन केली. राज्य समन्वयक मिलिंद साळवे, तालुका समन्वयक कारभारी गरड, संगीता मालकर, प्रतिभा कुलकर्णी, उज्ज्वला शेळके, प्रकाश जोंधळे, श्रीकांत बिडवे, प्रकाश इथापे, दत्तात्रय उरमुडे, बाळासाहेब जपे, दिलीप लोखंडे, जयश्री कुटे आदींनी या निर्णयाचे स्वागत केले.

Post a Comment

0 Comments