श्री येडूआई पिंपळदरी यात्रेसाठी वाहनातून येणाऱ्या भाविकांना प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये म्हणून सहकार्य करण्याची सकल आदिवासी समाज राहाता यांची मागणी!

शिर्डी (प्रतिनिधी)-श्री येडूआई पिंपळदरी, यात्रा यशस्वीपणे पार पडावी, या यात्रेसाठी राज्यभरातून वाहनांमधून येणाऱ्या भाविकांना कुठलाही त्रास होणार नाही. यासाठी पोलीस व प्रशासनाकडून आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात. यात्रेला वाहनातून येणाऱ्या भाविकांना पोलीस प्रशासनाकडून सहकार्य मिळावे. यासाठी राहाता तालुक्यातील सकल आदिवासी समाज बांधवांच्या वतीने एका शिष्टमंडळाने नुकतीच पुणे- नाशिक हायवेवरील डोळासणे महामार्ग पोलीस मदत केंद्रांवर भेट देऊन येथील पोलीस अधिकारी व पोलीस कर्मचाऱ्यांशी चर्चा केली. 

यावेळी येडूआई पिंपळदरी येथील यात्रेच्या पार्श्वभूमीवर विविध विषयावर चर्चा झाली. अशी माहिती सकल आदिवासी समाजाचे राहता तालुक्याचे युवा नेते विलास पवार यांनी दिली आहे.
  त्यांनी यावेळी सांगितले की, येडूआई पिंपळदरी यात्रा ही राज्यात एक मोठी व प्रसिद्ध यात्रा आहे. येथे मोठ्या संख्येने राज्यभरातून भाविक दर्शनासाठी व विविध नवस फेडण्यासाठी मोठ्या श्रद्धेने येत असतात. अनेकदा यात्रेला येणाऱ्या भाविकांच्या वाहनांना अडवून त्रास दिला जातो. असा त्रास भाविकांना होऊ नये. अशी मागणी यावेळी सकल आदिवासी समाज राहता तालुक्याच्या वतीने यावेळी पोलीस अधिकाऱ्यांकडे करण्यात आली. तसेच पोलीस अधिकाऱ्यांनीही यावेळी यात्रेला येणाऱ्या भाविकांनी पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे आम्हीही भाविकांना सर्व सहकार्य करू, असे आश्वासन देत भाविकांनी वाहनातून येताना वाहतुकीचे सर्व नियम पाळावेत, कोणीही मद्यपान करून वाहने चालू नये ,आपल्या सोबत येणाऱ्या आपल्या परिवाराची, मित्रमंडळाची योग्य ती काळजी घ्यावी ,वाहनांच्या टपावर बसून प्रवास करू नये. तसेच वाहनांच्या पाठीमागील फाळके उघडे ठेवून त्यावर बसून प्रवास करू नये, वाहतुकीचे नियम पाळावेत .असे आवाहन समस्त भाविकांसाठी पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले. यावेळी शिष्टमंडळात अनिल भाऊ रोकडे, योगेश आहेर सचिन सोनवणे ,सुरेश पवार शुक्लेश्वर माळी ,दिलीप माळी, संजय बर्डे आदी कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी शिष्टमंडळांनीही यात्रेला येणाऱ्या सर्व भाविकांनी वाहनातून येताना आपली काळजी घ्यावी असे आवाहन केले असल्याची माहिती विलास पवार यांनी दिली आहे.

Post a Comment

0 Comments