धुळे जवळ झालेल्या अपघातात सोयगाव तालुक्यातील २४ वर्षीय तरुण ठार,पोलीस होण्यासाठी गेला अन मृत्यू झाला---




दिलीप शिंदे 
सोयगाव दि.१८--पोलीस होण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी धुळ्याकडे जाणाऱ्या सोयगाव तालुक्यातील २४ वर्षीय तरुण ट्रकच्या धडकेत ठार झाल्याची घटना दि.१७ शुक्रवारी रात्री आठ वाजता धुळे जिल्ह्यातील बाबरे गावाजवळ घडली. 
बबलू तालेब पठाण( वय-२४) असे अपघातात ठार झालेल्या तरुणाचे नाव आहे.सोयगाव तालुक्यातील नांदगाव तांडा येथून धुळे येथे मोटारसायकल वर पोलीस भरती साठी जात असताना धुळे जवळ बाबरे गावाजवळ समोरून येणाऱ्या ट्रक क्र- आर जे -११ जि बी-५१३७ ने मोटारसायकल क्र-एम एच-२० ई डी-१६६६ ला जोरदार धडक दिल्या ने बबलू तालेब पठाण (वय २४)रा. नांदगाव तांडा ता.सोयगाव याचा जागीच मृत्यू झाला. त्याच्यावर धुळे येथील शासकीय रुग्णालयात शवविच्छेदन करून दि.१८ शनिवारी दुपारी तीन वाजता नांदगाव तांड्यात दफनविधी करण्यात आला.बबलू पठाण(वय-२४) हा धुळे येथे पोलीस भरतीच्या अनुषंगाने जाण्यासाठी निघाला होता. दि.१८ शनिवारी त्याची मैदानी चाचणी होती पोलीस होण्यासाठी गेलेल्या तरुणावर मृत्यूने झडप घातली त्यामुळे नांदगाव तांड्यात शोककळा पसरली होती. त्याच्या पश्चात आई-वडील, दोन भाऊ व दोन बहिणी असा परिवार आहे. त्याने पोलीस भरतीसाठी अनेक दिवसांपासून मेहनत घेतली होती. याच उद्देशाने त्याने विवाहही पुढे ढकलला होता. कुटुंबियांच्या इच्छेनुसार त्याचा साखरपुडाही झाला होता.परंतु पोलीस होण्यआधीच त्याचा वर काळाने झडप घातली.

Post a Comment

0 Comments