या पाण्याचा टाकीकडे टाकळीभान ग्रामपंचायत सत्ताधारी व पदाधिकारी व प्रशासन हे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे.


दिलीप लोखंडे 

टाकळीभान प्रतिनिधी -- श्रीरामपूर तालुक्यातील टाकळीभान लोकसंख्येच्या मानाने सर्वात मोठे गाव म्हणून ओळखले जाते लोकसंख्या 25 ते 30 हजाराच्या आसपास असून पिण्याच्या पाण्यासाठी जलपुरवठ्यासाठी अनेक टाक्यांचे शासकीय निधी खर्चून बांधकाम करण्यात आले परंतु अशाच एका टाकल्यावर बाजार समिती आवारातील गेल्या दोन वर्षापासून पडझड सुरू आहे परंतु या टाकीकडे ग्रामपंचायत सत्ताधारी व पदाधिकारी व प्रशासन हे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे.
          टाकळीभान या गावाला लोकसंख्या मोठी आहे त्याच तुलनेते पाण्याचा साठ आहे गोविंद सागर चा रूपाने टाकळीभान व परिसरातील 14 गावांच्या पाणीपुरवठा योजना याच गोविंद सागर वर अवलंबून आहेत अशातच 25 ते 30 हजार लोकसंख्या असलेल्या टाकळीभान गावाची पाण्याचे नियोजन याच जलाशयातून होत असून त्यासाठी साठवण म्हणून प्रत्येक वार्डात दोन दोन तीन तीन शासनाच्या निधीतून टाक्यांची उभारणी केली आहे परंतु अशा अनेक टाक्यांमध्ये पाणीच गेले नाही आणि पाणी न गेल्याने अनेक टाक्यांना तरीदेखील गेले आहेत शासनाचा पैसा खर्च करून गावासाठी व्यवस्था केलेल्या पाण्याच्या टाक्यांची मात्र ग्रामस्थांना काहीच उपयोग होत नसल्याचे निदर्शनास येत आहे.
          टाकळीभान ग्रामपंचायत च्या तात्कालीन सरपंच अर्चना रणनवरे यांच्याकडे बाजार समितीच्या अधिकाऱ्यांनी अनेक वेळा लेखी अर्ज देऊन सुद्धा सरपंच व त्यांच्या सहकाऱ्यांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले परंतु आता त्या टाकीची जास्त प्रमाणातच पडझड होत आहे या टाकीच्या परिसरात म्हणजेच एका बाजूने बाजार समिती व दुसऱ्या बाजूने आठवडे बाजार भरतो या टाकीचा काही भाग जर पडला तर त्या ठिकाणी असणाऱ्या बाजार करून ना किंवा बाजार समितीत काम करणाऱ्या लेबरला हानी होऊ शकते या हानीला कोण जबाबदार राहणार असा प्रश्न ग्रामस्थांना पडला आहे,

Post a Comment

0 Comments