राहाता तालुक्यातील हनुमंतगाव येथे क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती मोठ्या थाटात व उत्साह पूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. विशेष म्हणजे यावेळी एकलव्य भिल्ल सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष ज्ञानेश्वर अहिरे व शिक्षण क्षेत्रातील प्रख्यात असलेले कृष्णगर जेजुरकर हे गावातील दोन दिग्गज एकाच वेळी मंचावर उपस्थित होते.
क्रांतीसुर्य महात्मा फुले यांच्या विषयी आदर, प्रेम आणि अभिमान व्यक्त करण्यासाठी फुले प्रेमींनी विविध कार्यक्रमातून शुक्रवारी महात्मा फुले यांची ११९ वी जयंती उत्साहात साजरी केली. हनुमंतगाव येथे फुले युवा मंच, ज्ञानदीप वाचनालय, ग्रामपंचायत व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा यांच्यावतीने मान्यवरांच्या हस्ते महात्मा फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषद शाळेतील मुलांनी नेत्र दीपक सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून उपस्थितांची दाद मिळवली. तसेच फटाक्यांची अतिषबाजी करण्यात आली. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते मंचावर असलेल्या युग पुरुषांच्या प्रतिमांना पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. संपूर्ण गावामध्ये अतिशय उत्साह पूर्ण वातावरण निर्माण झाले होते. गावातील प्रमुख व्यक्तीसह तरुण वर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. जिल्हा परिषदेच्या मुलांनी सादर केलेल्या युग पुरुषाच्या जीवनावर आधारित गाण्यांनी परिसर रोमांचकारी झाला होता. यावेळी विखे कारखाण्याचे संचालक अशोक घोलप, कृष्णगर जेजुरकर, एकलव्य सेनेचे अध्यक्ष ज्ञानेश्वर अहिरे, सरपंच मनीषा माळी, उपसरपंच प्राजक्ता अनाप ,सदस्य रुबीना शेख ,दीपक घोलप, सुभाष ब्राह्मणे ,विकास अनाप, गोरक्षनाथ ब्राह्मणे ,डॉ. लक्ष्मण कानडे, पुंजाराम गावडे ,भीमराज घोलप, सचिन पवार, अतुल कुलकर्णी, भागवत ब्राह्मणे, रवींद्र पर्वत ,शुभम चिंधडे, संतोष राहींज ,श्री. पवार, शिक्षक नवगिरे ,सोमनाथ जेजुरकर, शब्बीर शेख ,उत्तम घोलप ,नवनाथ जेजुरकर, संजय पर्वत, किशोर अनाप, विकास गायकवाड, अभिषेक तुंबारे ,बाळासाहेब ब्राह्मणे, सुजित पर्वत तसेच महात्मा फुले युवा मंच उत्सव समिती सर्व सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 Comments