अहिल्यानगर ते नगर -मनमाड रोडवर झालेल्या कामाच्या साईट पट्ट्या न भरल्यामुळे मालवाहतूक ट्रक व टेम्पो होतात पलटी. याबाबतची सविस्तर माहिती अशी की नगर मनमाड रोडचे काम गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असून या डांबरीकरण झालेल्या रोडच्या साईट पट्ट्या न भरल्यामुळे अनेक अपघात सध्या होताना दिसत आहे.
कोल्हार पासून ते बाभळेश्वर चौकापर्यंत मोठ्या प्रमाणात डांबरीकरणाचे काम झाले आहे यामुळे या रोडवरून जाणाऱ्या येणाऱ्या ट्रक व ट्रॅक्टर मोटरसायकल व दुचाकी वाहनांच्या मोठ्या प्रमाणात वेगाने जाताना दिसत असून अनेक ठिकाणी वेगाने असलेल्या गाड्यांचे कट दुसऱ्या गाडीला बसल्यामुळे त्या गाड्या रोडच्या कडेला गेल्यामुळे पलटी होतानाचे चित्र सध्या दिसू लागले आहे. रविवारी पाच वाजण्याच्या सुमारास कोल्हार कडून येणारा मालवाहतूक टेम्पोला साईटने येणाऱ्या ट्रकने वेगाने कट मारल्यामुळे हा टेम्पो रोडच्या कडेला घेतला असल्यामुळे तो डायरेक्ट शेतामध्ये जाऊन पलटी झाला यामध्ये या टेम्पोचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून टेम्पो मधील चालक व नागरिक यामुळे बचावले आहे. त्यामुळे या झालेल्या डांबरीकरणाच्या रोडच्या साईट पट्ट्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी पाहणी करून तातडीने या साईट पट्ट्या लवकरात लवकर भराव्यात अशी मागणी या रोडच्या कडेला असणाऱ्या शेतकऱ्यांकडून व या रोडवरून प्रवास करणाऱ्या नागरिकांमधून होताना सध्या दिसत आहे. तसेच या झालेल्या रोडच्या डांबरीकरणाचे काम काही ठिकाणी मध्यंतरी झालेल्या पावसामुळे लगेच रोड फुटण्या झाल्याचे दिसून येत आहे.
0 Comments