शिर्डी (प्रतिनिधी)-राहाता तालुक्यातील रयत शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल, सावळविहीर (बु.) विद्यालयास नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघाचे आमदार श्री. किशोरभाऊ दराडे यांच्या वतीने BENQ कंपनीचा उत्कृष्ट HDMI प्रोजेक्टर नुकताच भेट देण्यात आला. या प्रोजेक्टरमुळे विद्यालयात डिजिटल शिक्षणाला चालना मिळणार असून विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने अध्यापन अधिक प्रभावीपणे करता येणार आहे.
या प्रसंगी आमदार दराडे साहेबांचे वैयक्तिक सहाय्यक श्री. मुंढे सर तसेच सहकारी श्री. अनारथे सर यांच्या उपस्थितीत प्रोजेक्टर विद्यालयाला सुपूर्द करण्यात आला. यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. बनसोडे सर व सर्व शालेय कर्मचारी यांनी आमदार दराडे यांचे मनःपूर्वक आभार मानले.
कार्यक्रमास मुख्याध्यापक श्री. बनसोडे सर, ज्येष्ठ शिक्षिका सौ. डहाळे मॅडम, श्री. म्हस्के सर, श्री. काळेगोरे सर, श्री. खान सर, श्री. खेडकर सर, श्रीम. कानडे मॅडम, श्री. धीवर सर, श्री. वाकचौरे सर तसेच ज्येष्ठ लेखनिक श्री. लोखंडे सर व इतर शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
या उपक्रमामुळे विद्यालयात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीस मोठा हातभार लागणार असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
0 Comments