विजय बोडखे
राहाता तालुक्यातील बाभळेश्वर येथील जागृत व ग्रामदैवत बिरोबा महाराज यात्रा कमिटीची बैठक पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर संपन्न झाली आहे. यात्रा उत्सवाच्या पार्श्वभूमीवर गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर यात्रा कमिटीची घोषणा करण्यात आली यात्रा उत्सव कमिटीच्या अध्यक्षपदी अण्णासाहेब बेंद्रे उपाध्यक्षपदी काकासाहेब म्हस्के व दौलत बेंद्रे तर खजिनदारपदी अमृत मोकाशी यांची निवड करण्यात आली. यात्रा उत्सवानिमित्त आयोजित आढावा बैठक खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली बैठकीत विविध विषयावर चर्चा करताना कार्यक्रमाची रूपरेषा निश्चित करण्यात आली 7 एप्रिल रोजी सकाळी ६ वाजता पुणतांबा येथून आणलेल्या कावडीने आणलेल्या पाण्याची तसेच मानाच्या काठीची मिरवणूक काढण्यात येणार आहे.
यानंतर पवित्र गंगाजलाने बिरोबा महाराज सह इतर देवतांना स्थान घालून अभिषेक व पूजा करण्यात येईल सायंकाळी ८ वाजता आरत्या व डबाची मिरवणूक होणार असून त्यानंतर शोभेच्या दारूची आत्ताच भाजी बाजी केली जाणार आहे रात्री १० वाजता छबिना मिरवणूक काढण्यात येणार आहे त्यानंतर पारंपारिक नृत्याचा कार्यक्रम रंगणार आहे 8 एप्रिल रोजी सकाळी १० वाजता हजेरीचा कार्यक्रम होईल सायंकाळी ४ वाजता जंगी कुस्त्याचा हंगामा रंगणार असून रात्री आठ वाजता हिंदवी पाटील यांचा हिरकणी आर्केस्ट्रा कार्यक्रम होणार आहे. या धार्मिक कार्यक्रमास गावातील सर्व नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे या बैठकीला पंचायत समितीचे माजी उपसभापती बबलू म्हस्के राहता बाजार समितीचे माजी अध्यक्ष तुकाराम बेंद्रे साहेबराव म्हस्के दादासाहेब म्हस्के रवींद्र म्हस्के सुधीर म्हस्के अनिल बेंद्रे प्रमोद बनसोडे श्रीकांत शिंदे राजेंद्र कांदळकर आधी सह ग्रामस्थ मोठ्या संख्येने या बैठकीस उपस्थित होते.
0 Comments