दिलीप शिंदे
सोयगाव दि. ३०-- सोयगाव तालुक्यातील फर्दापूर पोलिस ठाण्याचा उत्तम प्रकारे कार्यभार सांभाळणारे तत्कालीन दबंग सहाय्यक पोलीस निरीक्षक भरत मोरे यांनी सेवेचा अभिलेख उत्तम राखल्या बद्दल पोलिस महासंचालक महाराष्ट्र राज्य यांचे सर्वोत्कृष्ट सन्मानचिन्ह व पदकाने महाराष्ट्र दिनी गौरव करण्यात येणार आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी, भरत उत्तम मोरे, सहायक पोलीस निरीक्षक, ने.वाचक पोलीस अधिक्षक छत्रपती संभाजीनगर ग्रामिण हे पोलीस दलामध्ये दि.१३/०६/२००६ पासुन कार्यरत आहे त्यांची १९ वर्षे १० महिने १७ दिवस सेवा झालेली आहे. अहिल्यानगर जिल्ह्यात नेवासा पोलीस स्टेशन, श्रीगोंदा पोलीस स्टेशन, कोपरगाव शहर पोलीस स्टेशन, धुळे जिल्ह्यातील धुळे शहर पोलीस स्टेशन, बीड जिल्ह्यातील आष्टी पोलीस स्टेशन व कडा दुरक्षेत्र, छत्रपती संभाजीनगर ग्रामीण जिल्ह्यातील फर्दापूर पोलीस स्टेशन व शिवूर पोलीस स्टेशन येथे प्रभारी म्हणुन कार्यभार सांभाळलेला असून पोलीस अधिक्षक यांचे वाचक म्हणुन सध्या कर्तव्य पार पाडत आहे. त्यांनी विविध जिल्हयातील पोलीस ठाणे येथे कर्तव्य पार पाडत असतांना अनेक गंभीर गुन्हयाचे तपास केलेले आहेत त्यापैकी पोलीस ठाणे शिवूर येथे प्रभारी असतांना एटीएम चोरीसारख्या गुन्ह्यातील पाच राज्यातून फरार असलेला अट्टल गुन्हेगार यास एटीम मशिन व रोख रक्कम सह एकुण १५,२०,५००/ रु मुद्देमालासह अटक केली. तसेच कोपरगाव शहर पोलीस ठाणे येथे नेमणुकीस असतांना अटटल घरफोडी करणा-या आरोपीतास नागपुर येथून अटक करून तपासामध्ये देवास मध्यप्रदेश या ठिकाणी जाऊन त्यांचे ताब्यातून गुन्ह्यातील गेला माल ५० तोळे सोने हस्तगत केले होते.तसेच त्यांनी फर्दापुर पोलीस स्टेशन,शिवुर पोलीस स्टेशन,आष्टी पोलीस स्टेशन,धुळे शहर पोलीस स्टेशन,श्रीगोंदा पोलीस स्टेशन,नेवासा पोलीस स्टेशन व कोपरगांव शहर पोलीस स्टेशन असे एकुन ०७ पोलीस स्टेशन मिळुन ३०० हुन अधिक तपास केलेले असुन त्यामध्ये ०९ गंभीर खुनाचे तपास केलेले आहे. अनेक उत्कृष्ट कामगिरी बद्दल त्यांना सेवा कालावधीमध्ये ३११ बक्षिसे व ११ प्रंशसापत्रे मिळालेली असुन मागिल १९ वर्षाच्या सेवेचा अभिलेख उत्तम राखल्या बद्दल पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य मुबई यांचे सर्वेत्कृष्ट सन्मानचिन्ह पदक २०२६ ने महाराष्ट्र दिनी गौरविण्यात येणार आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक भरत मोरे यांनी केलेल्या उत्कृष्ट कामगिरी बद्दल त्यांना सन २०२६ चे सन्मानचिन्ह व पदकाने गौरविण्यात येणार असल्याने सोयगाव तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते संदीप इंगळे, दिलीप शिंदे, ईश्वर इंगळे,शरद दामधर,रमेश पाटील,शिवाजी महाकाळ, अमोल निकम, अनिल लोखंडे,अशोक ढगे आदींनी अभिनंदन करीत शुभेच्छा दिल्या.
0 Comments