दिलीप शिंदे
सोयगाव दि.११-- सोयगाव तालुक्यातील वडगाव तिग्जी येथील कै. देविदास रामलाल सोनवणे यांची मुलगी सोनाली देविदास सोनवणे हिचे लहानपणी वडिलांचे छत्र हरवले असताना .
प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत जिद्द व अथक परिश्रमाच्या बळावर यशाला गवसणी घालीत महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या कर सहायक व महसूल सहायक पदी निवड झाल्याबद्दल शिंदोळ येथील ग्रामस्थांच्या वतीने सोनाली सोनवणे हिचा शिंदोळ येथील सामाजिक कार्यकर्ते योगेश बोरसे यांनी शाल श्रीफळ व भेट वस्तू देऊन सत्कार केला यावेळी सोनवणे व बोरसे कुटुंब उपस्थित होते.
0 Comments