दिलीप शिंदे
सोयगाव दि.१०-- सोयगाव येथे पंचायत समिती अंतर्गत विविध विकास कामांची आढावा बैठक जिल्हा परिषदेचे नवनिर्वाचीत जिल्हा परिषद अध्यक्ष अविनाश पाटील गलांडे यांच्या अध्यक्षतेखाली बचत भुवन येथे दि.१० शुक्रवारी दुपारी पार पडली. आढावा बैठकी दरम्यान गोंदेगाव गटाच्या जिल्हा परिषद सदस्या सुनीता चव्हाण यांना व्यासपीठावर पहिल्या रांगेत स्थान न देता दुसऱ्या रांगेत स्थान देण्यात आल्याने गोंदेगाव गटाच्या उपस्थित नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात होता.मात्र जिल्हा परिषदेच्या आरोग्य व शिक्षण सभापती अनिता मोटे यांचे पती यांना पहिल्या रांगेत स्थान देण्यात आले.
होते.इतकेच नव्हे तर आढावा बैठकी दरम्यान घोसला येथील सांडवा प्रकरणी मार्गदर्शन केल्याने आढावा बैठक ही शासकीय की भाजपाची अशी चर्चा आढावा बैठकीला उपस्थीत नागरिकांमध्ये रंगली होती. महिला सरपंच असल्यास पतीचा हस्तक्षेप आढळून आल्यास कारवाई करण्यात येईल या नियमालाच भाजपाने तिलांजली दिली आहे. सोयगाव पंचायत समिती अंतर्गत विविध विकास कामांचा आढावा घेण्यात आला.यावेळी उपस्थितांनी गायगोठे अनुदान, विहिरी घरकुल, जलजीवन आरोग्य याविषयी मोठ्या प्रमाणात समस्या मांडल्या.अनेक शासकीय कार्यालयातील रिक्त पदा संदर्भात चर्चा करण्यात आली. विविध तक्रारींचा दोन महिन्यात निपटारा करावा अशा सूचना जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अविनाश पाटील गलांडे यांनी केल्या.छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेत संपूर्ण भाजपा ची सत्ता असल्याचे सांगितले.पदाधिकारी व अधिकारी, कर्मचारी यांनी समन्वय साधून विकासावर भर द्यावी मी त्यांच्या पाठीशी उभा राहील अशी ग्वाही दिली. यावेळी अतिरीक्त मुख्य कार्यकारी अधिकारी साळुंखे, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष जैस्वाल, जिल्हा परिषद सदस्या पुष्पा काळे,सुनीता चव्हाण, माहिम मुलतानी, पंचायत समितीचे सभापती उत्तम चव्हाण,पंचायत समिती सदस्य राहुल राठोड,जयश्री पवार, गटविकास अधिकारी शिवाजी यमुलवाड आदींसह कर्मचारी,शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
चौकट:- जिल्हा परिषद विषय समित्यांच्या सभापती निवडीत आमखेडा गटाच्या जिल्हा परिषद सदस्या पुष्पा काळे यांना वरिष्ठ भाजपा नेत्यांनी डावलल्याने नेटकऱ्यांनी भाजपच्या नेत्यांचे वाभाडे काढले होते. सोयगाव पंचायत समिती अंतर्गत विविध विकास कामांचा आढावा बैठकीसाठी आलेल्या जिल्हा परिषदेचे नवनिर्वाचीत अध्यक्ष अविनाश पाटील गलांडे यांचे अभिनंदनाचे पंचायत समिती जवळ लावलेले बॅनरवर आता तरी अन्यायाची भरपाई करा आणि भरघोस निधी मंजूर करा,तुमच्याकडून तरी तालुक्याला न्याय मिळेल हीच अपेक्षा असे लिहिलेले असल्याने हे बॅनर नागरिकांचे लक्ष वेधून घेत होते.
0 Comments