वनविभाग व प्राणी मित्र यांच्या सहकार्याने सात्रळ येथे एक बिबट्या जेरबंद ! 

राजुरी( वार्ताहर )

वनविभागाचे,व प्राणी मित्र यांच्या विशेष सहकार्याने सात्रळ येथे एक बिबट्या जेरबंद करण्यात वन विभागाला यश आले आहे.

राहुरी तालुक्यातील सात्रळ येथे दावीद फकिरा पलघडमल यांच्या शेतात बिबट्या जेरबंद करण्यात वनविभाग व प्राणीमित्र यांना यश आले.गेल्या महिन्यापासून पलघडमल/ साबळे वस्तीवर तीन बिबट्यांनी मुक्काम ठोकला आहे त्यामुळे या परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते त्यामुळे वनविभागाने तात्काळ पिंजरा लावला.
सहा दिवसापूर्वी दावीद फकिरा पलघडमल यांच्या गट नंबर २९०/२ मध्ये पिंजरा लावण्यात आला होता. त्या पिंजऱ्यात कोंबड्या ठेवण्यात आल्या. बुधवार दिनांक १ एप्रिल रोजी रात्री २ वाजता कोंबड्यांच्या सावजाला आकर्षून बिबट्याचे एक वर्ष वयाचे मादी पिल्लू अलगत जेरबंद झाले.
बिबट्याचे पिल्लु जेरबंद झाल्यानंतर पहाटे प्रविण पलघडमल यांनी बॅटरी लावली असता पिंजऱ्याजवळ एक पिल्लु आणि एक मोठी मादी बिबट्या दिसले. त्यांनी वनविभाग राहुरी व प्राणीमित्र विकास म्हस्के यांना माहिती दिली.
माहिती मिळताच सकाळी वनपाल एस. आर. कोरके, वनरक्षक घुगे, बी.आर.दिवे, एस. आर. झंझट, वन कर्मचारी पठाण, अपदाचे अनिल जाधव प्राणीमित्र विकास म्हस्के घटनास्थळी पोहोचले. व सदर माहिती अहिल्यानगर जिल्ह्याचे उपवनसंरक्षक अधिकारी श्री धर्मवीर सालविठ्ठल, सहाय्यक उपवनसंरक्षक अधिकारी गणेश मिसाळ, राहुरीचे वनपरिक्षेत्र अधिकारी सुनिल साळुंखे यांना माहिती देण्यात आली.
जेरबंद बिबट्याला दुसऱ्या पिंजऱ्यात शिफ्ट करून पिंजरा हलवण्याची कार्यवाही केली. आणि पिंजरा परत त्याच ठिकाणी लावण्यात आला.
यावेळी बिबट्याला पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांनी गर्दी केली होती व यावेळी प्रविण पलघडमल, सचिन पलघडमल , प्रभाकर पलघडमल , राजु साबळे यांनी मदत केली.
वनविभागाने परत पिंजरा लावल्याबद्दल परिवारातील नागरिकांची समाधान व्यक्त केले व वनविभागाचे आभार मानले.

Post a Comment

0 Comments