हिंदुस्तान फीड्स कंपनी तर्फे गणेशनगर जवळील बोरावके वस्ती शाळेला टिफिन बॅग आणि टिफिन बॉक्स चे वाटप



शिर्डी ( प्रतिनिधी)-राहाता तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा बोरावके वस्ती या शाळेला सामाजिक उपक्रमांमध्ये नेहमीच अग्रगण्य मानल्या जाणाऱ्या हिंदुस्तान फीड्स कंपनी तर्फे शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना दर्जेदार अशा टिफिन बॅग आणि टिफिन बॉक्स चे वाटप नुकतेच करण्यात आले. त्यावेळी कंपनीचे तालुका अधिकारी किरण गायकवाड उपस्थित होते, तसेच प्रमुख उपस्थिती म्हणून प्रगतशील शेतकरी शेखर गायकवाड, अण्णासाहेब गोरे, कर्डिले नाना, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गणेशभाऊ आरणे आणि शिक्षक संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष दत्ता गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते. 

मुख्याध्यापक अमोल साळवे यांनी प्रास्ताविकामध्ये शाळेतील नवनवीन उपक्रमांची माहिती दिली आणि आलेल्या पाहुण्यांचे स्वागत केले ,तसेच दत्ता गायकवाड यावेळी म्हणाले की, राहता तालुक्यातील विविध उपक्रम राबवत असलेली ही एक गुणवत्तापूर्ण शाळा आहे .या शाळेला पालकांचे अनमोल सहकार्य सतत असते. कंपनीने केलेल्या या सामाजिक उत्तरदायित्वाबद्दल त्यांनी पंचायत समितीच्या वतीने या कंपनीचे विशेष आभार मानले. कंपनीचे तालुका अधिकारी किरण गायकवाड यावेळी म्हणाले की, कंपनीने आतापर्यंत तालुक्यातील 95 टक्के जिल्हा परिषद शाळांना सीएसआर फंडातून विविध प्रकारचे मदत केलेली आहे. सदरच्या कार्यक्रमाबद्दल गणेशनगर केंद्राचे केंद्रप्रमुख सोमनाथ वैद्य यांनी कौतुक केले. शाळेतील उपशिक्षक गणेश कुमावत यांनी उपस्थित यांचे आभार मानले. यावेळी विद्यार्थी ,शिक्षक, पालक उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments