दिलीप शिंदे
सोयगाव दि.२२ -- सोयगाव तालुक्यातील गलवाडा येथे शिवजयंतीनिमित्त निवृत्त मुख्याध्यापक आनंदा गडबड इंगळे यांच्याकडून दि.२१ मंगळवारी शिवचरित्र व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. सुप्रसिद्ध शिवव्याख्याते सुरज आगे यांनी प्रभावी शैलीत छत्रपती शिवाजी महाराज यांचे शिवचरित्र उलगडून सांगत उपस्थितांना अक्षरशः भावूक केले.व्याख्यानादरम्यान त्यांनी शिवाजी महाराजांच्या कार्यातून हिंदवी स्वराज्याची स्थापना कशी झाली, याचे सखोल विश्लेषण त्यांनी त्यांच्या ओजस्वी वाणीतून केले.
शिवाजी महाराजांनी सर्व समाजघटकांना एकत्र आणत ‘अठरा पगड जातींचे मावळे’ घडवले, असे सांगत त्यांनी सामाजिक ऐक्याचा संदेश दिला. यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संघर्षमय जीवनाचा दाखला देत आत्महत्येसारखा मार्ग न स्वीकारता शिक्षण व संघर्षातून मार्ग काढण्याचे आवाहन करण्यात आले. कुटुंबात संस्कार रुजवणे, मुलांना संस्कृतीची शिकवण देणे आणि व्यसनांपासून दूर राहण्याचेही त्यांनी आवाहन केले.आजच्या तरुणांनी मोबाईलचा अतिरेक टाळून व्यायामाला प्राधान्य द्यावे, अन्यथा आरोग्यावर परिणाम होतो, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. अंधश्रद्धा व खोट्या बाबा बुवांच्या मागे लागू नये, असा सल्लाही त्यांनी दिला.
कार्यक्रमाच्या शेवटी आनंदा इंगळे यांनी आभार मानले. कार्यक्रमास अनिल इंगळे, सुनील सैदाणे, दीपक सोनवणे, अक्षय औरंगे, ओम इंगळे, रमेश चक्के, यश देशमुख, ऋषिकेश देशमुख, निलेश इंगळे, रणवीर इंगळे, शुभम पाटील, गोपाल पाटील, रोहित देशमुख, विजय सोनवणे, योगेश इंगळे, आशुतोष पाटील, गोपाल मंडवे, विकास मंडवे, शिवानंद औरंगे, सुमित खिरडकर, ललित इंगळे आदींसह गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 Comments