दिलीप शिंदे
सोयगाव दि.२२ -- राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा कार्यकर्ता,
समाजासाठी निःस्वार्थपणे झटणारा, हिंदुत्वाच्या विचारांसाठी सदैव तत्पर असलेला एक समर्पित कार्यकर्ता अशी ख्याती असलेला सोयगाव नगरपंचायत भाजपा माजी नगरसेवक तथा गटनेत योगेश पुंडलिक मानकर (वय -४५ ) यांचे दि.२२ बुधवारी पहाटे पावणे सहा वाजेच्या सुमारास दुःखद निधन झाले.
त्यांच्यावर बुधवारी दुपारी दोन वाजता सोना नदी तीरावरील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा,एक मुलगी,आई,भाऊ,बहीण असा परिवार आहे. योगेश मानकर यांच्या निधनामुळे समाजकार्यात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.
0 Comments