प्रवरानगर – जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, प्रवरानगर येथील विद्यार्थी अथर्व रावसाहेब गोल्हार याने जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेत यश संपादन करत पात्रता मिळवली आहे. त्याच्या या निवडीमुळे शाळा व परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
अथर्व हा अभ्यासू, जिज्ञासू व मेहनती विद्यार्थी असून त्याच्या या यशाबद्दल सर्वत्र कौतुक केले जात आहे.
त्याने शाळेचे मुख्याध्यापक नामदेव फटांगरे सर तसेच त्याच्या वर्गशिक्षिका श्रीम. मनिषा सपकाळे तसेच श्रीम. मनिषा गावडे व श्री. महादेव कानडे यांच्या
मार्गदर्शनाखाली त्याने सातत्यपूर्ण अभ्यास करून हे यश मिळवले आहे. यापूर्वी या शाळेच्या विद्यार्थ्यांनी सैनिकी विद्यालय प्रवेश परीक्षेत देखील उत्तम प्रकारचे यश मिळविले आहे. जिल्हा परिषदेच्या या शाळेत
विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध उपक्रम राबविण्यात येतात. यामध्ये कुसुमाग्रज वाचन अभियान, शिष्यवृत्ती परीक्षा तयारी, जवाहर नवोदय परीक्षा, डिजिटल शिक्षण, क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रम तसेच अहिल्यानगर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय आनंद भंडारी तसेच शिक्षणाधिकारी भास्कर पाटील यांच्या संकल्पनेतून जिल्हा परिषदेमार्फत राबविण्यात येणाऱ्या मिशन आरंभ स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व सराव उपक्रमाचा समावेश आहे. या विविध गुणवत्तापूर्ण उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास व स्पर्धात्मकता वाढण्यास मदत होत आहे.
अथर्वच्या या यशाबद्दल जलसंपदा मंत्री तथा अहिल्या नगरचे पालकमंत्री मा. डॉ. राधाकृष्णजी विखे पाटील तसेच जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालिनीताई विखे पाटील यांनी त्याचे विशेष अभिनंदन केले आहे. जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेत अथर्वने उल्लेखनीय यश संपादन करत शाळेचा व गावाचा नावलौकिक वाढवला असून सर्व शिक्षक, शाळा व्यवस्थापन समिती यांनी अथर्व यास पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत
0 Comments