दिलीप शिंदे
सोयगाव दि.६ - संत श्रेष्ठ संत तुकाराम महाराज यांचे देहू हे जन्मस्थान. ते जगातील तिसरे पर्यावरण वादि संत आहेत. शुद्ध बिजा पोटी, वृक्ष वल्ली आदी अभंगातून निसर्ग रक्षणाचा संदेश त्यांनी चारशे वर्षांपूर्वी जगास दिला. इंद्रायणी नदी काठी असलेल्या या गावी नांद्रुक वृक्ष मोठया प्रमाणात पूर्वापार असून या वृक्षाच्या सानिध्यात संत तुकाराम महाराज यांनी अनेक अभंग रचना केल्या, आयुष्य व्यतीत केले. याच देहू येथील नांद्रुक वृक्षावरून ते वैकुंठास गेले. दरवर्षी तुकाराम बीजेच्या दिवशी देहू येथे मोठा सोहळा असतो, लाखो भाविक येथे जमतात व स्थळ- काळ ऊर्जेंने दुपारी १२ वाजून २ मिनिटांनी हा दैवी व सहाशे वर्षांहुन अधिक वयाचा हा नांद्रक वृक्ष जोरात सळसळतो. हा वृक्ष नैसर्गिक रित्या उगम झालेला दुर्मिळ रित्या आढळतो. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सिल्लोड जिल्हा शाखेच्या गतीविधी रचनेच्या वतीने डॉ. संतोष पाटील यांनी पंच परिवर्तन / पर्यावरण या आयामाद्वारे छ. संभाजी नगर व जालना जिल्ह्यात १० ठिकाणी आज बीजेच्या निमित्ताने काष्ठ-रोपं रोपण केले आहे.डॉ. पाटील हे गत चार वर्षांपासून हरितवारी हा आध्यत्म व पर्यावरण यांचा मेळ घालणारा उपक्रम राज्यभर राबवत आहे. संघ कार्याचे प्रसिद्ध कीर्तनकार हभप संतोष महाराज आळवणे, कीर्तनकार ज्ञानेश्वर महाराज सेलूदकर, जगन्नाथ गिरी महाराज, सारोळा यांसह अनेक संतांनी कौतुक केले आहे.
-------नांद्रुक निसर्गाचा ए. सी.-- हा वृक्ष दिवसातून १८ ते २० तास ऑक्सिजन उत्सर्जित करणारा असून हे एक झाड रोज सरासरी २७५ लिटर प्राणवायू निर्माण करते. शिवाय हे एक झाड वार्षिक ४० किलो कार्बन डाय ऑक्साईड वायू शोषून वर्षाला ते कार्बन शोषून जागतीक तापमान वाढ व प्रदूषण घटवण्यास हातभार लावतात.
-- नांदरकीचे जैवविविधता योगदान* - हळद्या, चष्मेवाला, बुरखा हळद्या, कोकिळ, लालबुड्या बुलबुल, हरेवा, हरेळी, जंगली मैना, राखी धनेश ई. १५ हुन अधिक प्रजातीचे पक्षी व खार याची फळे खातात.
0 Comments