सावळी विहीर कारवाडी परिसरामध्ये गेल्या आठवड्यापासून वेगवेगळ्या ठिकाणी बिबट्या दिसून आला आहे. काही ठिकाणी तो सीसीटीव्ही कॅमेरातही कैद झाला आहे. बिबट्याने काही कुत्र्यांचा फडशा पाडल्याचे बोलले जात आहे. या बिबट्यामुळे लहान मुले व शेतकरी, नागरिकांमध्ये घबराट निर्माण झाले आहे. रात्रीचे शेतीला पाणी भरण्यासाठी शेतकरी आता घाबरत आहेत. त्यामुळे या भागामध्ये रात्री व दिवसा या वेळेत विजपुरवठा सुरळीत ठेवावा. जेणेकरून दिवसा शेतकरी शेताला पाणी देऊ शकतील. अशीही चर्चा होत आहे. आता या भागात ऊस तोड बंद झाली आहे. तरीही बिबट्यांचा वावर या भागात दिसून येत आहे. बागायती भाग असल्यामुळे बिबट्याला लपण आहे. गेल्या काही दिवसापूर्वी सावळविहीर खुर्द शेतकी फार्म परिसरातही बिबट्या दिसून आला होता. या भागात बिबट्यांची संख्या अधिक असण्याची शक्यता आहे.तरी वन विभागाने याकडे लक्ष देण्याची मागणी करण्यात आली आहे.
0 Comments