कोपरगाव ता. पोलीस ठाणे नविन इमारत व पोलीस कर्मचाऱ्यांसाठी ६४ निवासस्थानांचा उद्घाटन समारंभ मंगळवारी




शिर्डी ( प्रतिनिधी)-महाराष्ट्र राज्य पोलीस गृह निर्माण व कल्याण महामंडळ मर्यादित, मुंबई यांच्या अंतर्गत जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय, अहिल्यानगर यांच्या समन्वयातून उभारण्यात आलेल्या नवीन कोपरगाव तालुका पोलीस ठाणे इमारत व ६४ पोलीस कर्मचारी निवासस्थानांचा उद्घाटन समारंभ मंगळवार दि. ३ मार्च २०२६ रोजी सायं. ४.३० वाजता विविध मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडणार आहे.
 कोपरगाव तालुका पोलीस ठाणे परिसरात बांधण्यात आलेल्या या प्रकल्पामध्ये कोपरगाव तालुका पोलीस ठाणे नवीन इमारत व पोलीस अधिकाऱ्यांसाठी टाईप-३ चे ८ निवासस्थान
पोलीस अंमलदारांसाठी टाईप-२ चे ५६ निवासस्थान
अशा एकूण ६४ सुसज्ज घरांचा समावेश आहे. या निवासस्थानांमुळे पोलीस कर्मचाऱ्यांना कर्तव्य पार पाडताना अधिक स्थैर्य व सुरक्षितता लाभणार आहे.
या इमारतीचे उद्घाटन मा. ना. डॉ. राधाकृष्ण विखे पाटील, (पालकमंत्री तथा मंत्री गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळ) यांच्या हस्ते होणार आहे. 


तर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून महाराष्ट्र राज्याचे विधान परिषदेचे सभापती ना. प्रा.राम शिंदे हे राहणार आहेत. तर या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून शिर्डीचे खा. भाऊसाहेब वाकचौरे ,अहिल्यानगरचे खा. निलेश लंके, आ.सत्यजित तांबे,आ. शिवाजीराव गर्जे,आ. किशोर दराडे ,आ.श्रीमती मोनिका राजळे ,आ.संग्राम जगताप,आ. डॉक्टर किरण लहामटे, आ.आशुतोष काळे आ. रोहित पवार ,आ. अमोल खताळ, आ.हेमंत ओगले ,आ. विठ्ठलराव लंघे ,आ. काशिनाथ दाते ,आ. विक्रम पाचपुते, मा.खा. सुजय विखे पाटील , माजी आ.सौ.स्नेहलता कोल्हे, कोपरगावचे नगराध्यक्ष पराग संधान, तसेच महाराष्ट्र राज्याचे पोलीस महासंचालक सदानंद दाते, गृहनिर्माण व कल्याण महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक व पोलीस महासंचालक श्रीमती अर्चना त्यागी, आदींसह विशेष पोलीस महानिरीक्षक नाशिकचे दत्तात्रय कराळे ,अहिल्यानगरचे जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी, मुख्य अभियंता राजारामपुरी गोसावी, अधीक्षक अभियंता राहुल गिरीबुवा, आदीसह विविध मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

 तरी या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, श्रीरामपूर चे अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे, शिर्डीचे पोलीस उपविभागीय अधिकारी अमोल भारती यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments