टाकळीभान प्रतिनिधी:- पत्रकारितेच्या माध्यमातून समाजप्रबोधनाची मशाल तेवत ठेवणाऱ्या टाकळीभान येथील ज्येष्ठ पत्रकार चंद्रकांत लांडगे यांना यंदाचा मानाचा 'माधवबाबा जीवन गौरव पुरस्कार' देऊन गौरवण्यात आले. मातापूर येथील गुरुदेव सेवा आश्रमाच्या वतीने आयोजित एका सोहळ्यात पुरस्काराचे वितरण श्रीगणेश संस्थान शिवराईचे मठाधिपती १००८ श्री महंत स्वामी विष्णुगिरीजी महाराज, श्री बालाजी संस्थान नागमठाणचे मठाधिपती आचार्य १०८ श्री महंत स्वामी ज्ञानानंदगिरीजी महाराज, १०८ श्री स्वामी चैतन्यानंदजी भारती महाराज, गुठंडे महाराज यांच्या हस्ते झाले.
0 Comments