चैत्र नवरात्रीला आत्मशुद्धी आणि मुक्तीचा मानले जाते आधार! आदिशक्तीच्या नऊ वेगवेगळ्या दुर्गा मातेच्या रूपात केली जाते भक्ती साधना उपासना! होते मनोकामना पूर्ण----महंत आत्मारामगिरीजी महाराज

शिर्डी (प्रतिनिधी )-चैत्र नवरात्रीला अध्यात्मिक दृष्टीने मोठे महत्त्व असून पुराणांमध्ये चैत्र नवरात्रीला आत्मशुद्धी आणि मुक्तीचा आधार मानले आहे.

 या चैत्र नवरात्रीमध्ये नऊ दिवस भौतिक ,शारीरिक, आध्यात्मिक अशी उपासना करून आदिशक्तीची भक्ती केली जाते.हे दिवस आदिशक्तीचे उपवासनेचे महापर्व आहे. या चैत्र नवरात्री मध्ये आदिशक्ती देवीचे नऊ दिव्य रूप नवदुर्गा यांची भक्ती भावाने वेगवेगळ्या रूपात पूजा केली जाते. प्रत्येक देवीचे रूप हे वेगवेगळ्या शक्ती साधना आणि आत्मोन्नतीचे प्रतिक आहे. असे श्री नर्मदेश्वर सेवाधामचे महंत संन्यासी राजराजेश्वरी ,रुद्राक्ष शिवमुकुटधारी आत्माराम गिरीजी महाराज‌ यांनी म्हटले आहे. 
 पुढे त्यांनी म्हटले आहे की, या चैत्र नवरात्रीमध्ये आदिशक्तीच्या वेगवेगळ्या नवरुपात असणारी देवी माता ही या काळातील उपासकांना त्यांची प्रत्येक मनोकामना पूर्ण करण्यास मदत करते. या काळामध्ये या नवदुर्गा मातांची विस्तृत वंदना व भक्ती केली जाते. चैत्र नवरात्रीत पहिल्या दिवशी माता शैलपुत्री यांचे यांचे पूजन केले जाते. ही देवी माता
हिमालयाची कन्या, स्थैर्य आणि निश्चयाचे प्रतीक असून त्यांच्या कृपेने साधकाला जीवनात दृढता प्राप्त होते.तर माता ब्रह्मचारिणी हे नवदुर्गेचे दुसरे रूप असून
तपश्चर्या, संयम आणि साधनेची मूर्ती आहे. या दुर्गामाता भक्ताला ज्ञान, त्याग आणि साधना यांची प्रेरणा देतात. माता चंद्रघंटा हे नवदुर्ग चे तिसरे रूप असून
शांतता आणि पराक्रम यांचा अद्भुत संगम आहे.त्यांच्या कृपेने भय दूर होते आणि साहस वाढते.तर माता कुशमांडा या चौथ्या रूपातील दुर्गामाता
सृष्टीची आदिशक्ती आहे, या मातेने आपल्या हास्याने विश्व निर्माण केले. आरोग्य, तेज आणि समृद्धी देणारी दुर्गा माता आहे. तर देवीचे पाचवे रूप माता स्कंदमाता दुर्गा मातेच्या असून भगवान कार्तिकेय (स्कंद) यांची माता, प्रेम आणि मातृत्वाची ती साक्षात मूर्ती आहे.तर सहावे रूप हे माता कात्यायनी असून दुर्गेचे उग्र आणि शक्तिशाली रूप, अन्यायाचा नाश करणारी ही दुर्गामाता आहे. माता कालरात्री सातवी दुर्गा माता रुप असून अज्ञान, भय आणि संकटांचा नाश करणारी आहे. त्यांचे रूप उग्र असले तरी त्या सदैव शुभ फल देतात.तर माता महागौरी हे दुर्गे मातेचे आठवे रूप असून शुद्धता, शांतता आणि सौंदर्याची हि देवी आहे. त्यांच्या कृपेने सर्व पापांचे शुद्धीकरण होते. तर शेवटचे दुर्गा मातेचे नववे रूप हे माता सिद्धिदात्री असून
सर्व सिद्धी आणि आध्यात्मिक शक्ती देणारी ही परम देवी‌ आहे. या चैत्र नवरात्रीत या नवदुर्गा रूपातील अदिशक्तींची भक्ती, साधना ,उपासना केली जाते. असे हे चैत्र नवरात्रीतील नऊ दिवस खूप शुभ असल्याचे मानले जाते. यादरम्यान कुठल्याही शुभकार्य अगदी विचार न करता आणि मूहूर्त न बघता देखील करता येतात. कारण पूर्ण सृष्टीला आपल्या मायेने पांघरणारी आदिशक्ती या काळात पृथ्वीवर असते. चैत्र शुक्ल प्रतिपदेपासून हिंदू नववर्षाची सुरुवात होते. तिसऱ्या चैत्र नवरात्रीत प्रभू विष्णूंनी मत्स्य रूपात पृथ्वीची स्थापना केली होती .नंतर प्रभू विष्णू प्रभू राम या रूपात देखील चैत्र नवरात्रीत प्रगट झाले होते. म्हणून या चैत्र नऊ दिवसांचे खूप महत्त्व आहे. असे महंत राजराजेश्वरी संन्यासी रुद्राक्षशिवमुकुटधारी आत्माराम गिरीजी महाराज यांनी म्हटले आहे.

Post a Comment

0 Comments