राहाता तालुक्यातील सावळीविहीर बुद्रुक प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अंतर्गत येणाऱ्या सर्व गावातील वयोगट 14 वर्षे पूर्ण व पंधरा वर्षाच्या आतील मुलींनी एच पी व्ही वॅक्सिन लसीकरण करून घ्यावे. अशा मुलींच्या पालकांनीही आपल्या मुलींना लसीकरण करुन घेण्यासाठी पुढाकार घ्यावा असे आवाहन सावळीविहीर बुद्रुक प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर आर.बी गोर्डे व डॉ.जी आय टाकरस यांनी केले आहे.
राहाता तालुक्यातील सावळी विहीर बुद्रुक प्राथमिक आरोग्य केंद्र मध्ये एच पी व्ही वॅक्सिंग लसीकरण शिबिराचे उद्घाटन सरपंच ओमेश जपे ,व ग्रामपंचायत तसेच सोसायटीचे पदाधिकारी यांचे उपस्थितीत नुकतेच संपन्न झाले. यावेळी डॉक्टर आर.बी.गोर्डे यांनी हे आवाहन केले.
या शिबिरामध्ये या वयोगटातील मुलींना एच पी व्ही वॅक्सिंग लसीकरण करण्यात येऊन त्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्रही देण्यात आले. त्याचप्रमाणे यावेळी उपस्थितांना या एच पी व्ही वॅक्सिंगचे लसीकरणाचे महत्त्व डॉक्टर गोर्डे व डॉक्टर टाकरस यांनी समजावून सांगून लवकरात लवकर 14 वर्षे पूर्ण व पंधरा वर्षाच्या आतील वयोगटाच्या सर्व मुलींनी एच पी व्ही वॅक्सिंग लसीकरण करून घ्यावे. असे आवाहान केले. त्यासाठी सावळीविहीर बुद्रुक प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अंतर्गत येणाऱ्या सावळीविहीर बुद्रुक, सावळीविहीर खुर्द ,रुई, शिंगवे, पिंपळवाडी , आदी गावातील पालक, ग्रामस्थांनी हे सहकार्य करावे .असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्य सहाय्यक आर.सी शिंदे, आरोग्य सहाय्यिका श्रीमती माळी एम.बी तसेच इतर सर्व आरोग्य कर्मचारी ,आरोग्य सेविका ,आशा सेविका तसेच ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते.
0 Comments