संगमनेर तालुका जनरल प्रॅक्टिशनर्स असोसिएशनच्या वतीने संगमनेर शहर पोलिस निरीक्ष बारावकर यांना निवेदन
संगमनेर---शहरातील गोल्डन सिटी (गुंजाळवाडी) परिसरातील डॉ.सुपे क्लिनिक व जनरल हॉस्पिटलमध्ये दोघा मद्यपी तरुणांनी अनधिकृत प्रवेश करून साहित्याची तोडफोड केली तर हॉस्पिटलमधील कर्मचाऱ्यांना मारहाण करणाऱ्या आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी या संदर्भात संगमनेर तालुका जनरल प्रॅक्टिशनर्स असोसिएशनच्या वतीने निवेदन देण्यात आले.
निवेदनात म्हटले की, डॉ.सुपे क्लिनिकमध्ये रात्रीच्या सुमारास दोघे तरुण मद्य प्राशन करुण होस्पिटलमध्ये गोधळ घालत हॉस्पिटलची तोडफोड करून उपस्थित कर्मचाऱ्यांना शिवीगाळ व मारहाण करण्यात आली.
वैद्यकीय सेवेत सर्व डॉक्टर्स अहोरात्र सेवा देत असतात मात्र प्रामाणिकपणे सेवा देऊनही जर काही व्यक्ती अशा प्रकारे कृत्य करत असेल तर ते अतिशय निंदनीय असून या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करून संबंधित आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करून यापुढील काळात अशा घटना होऊ नये यासाठी ठोस उपाययोजना करण्यासंदर्भात पोलिस निरीक्षक समीर बारावकर यांनी असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांना आश्र्वासित केले. उपस्थित डॉक्टरांच्या मागणीबाबत श्री बारवकर यांनी सकारात्मक चर्चा घडून आणल्याबद्दल असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांचे आभार मानले.
0 Comments