टाकळीभान प्रतिनिधी- : टाकळीभान येथील भाऊसाहेब शंकर गव्हाणे यांची अ. भा. गोपाळ श्रीकृष्ण उत्कर्ष युवक संघ क्रिडा अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
या निवडी संदर्भातील पत्र त्यांना नूकतेच मिळाले आहे. राष्ट्रहित व समाजहित जोपासून, युवकांमध्ये एकी, शिस्त, संघटन व सामाजिक बांधिलकी अधिक दृढ करण्यासाठी व गोपाळ समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी कार्यरत असणाऱ्या अ. भा. गोपाळ समाज उत्कर्ष संघाकडून भाऊसाहेब गव्हाणे यांची निवड करण्यात आली आहे. या निवडीबद्दल गव्हाणे यांचा शेतकरी संघटना व टाकळीभान ग्रामस्थांच्या वतीने नुकताच सन्मान करण्यात आला.
या निवडीबद्दल शेतकरी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष अजित काळे यांच्या हस्ते व टाकळीभान ग्रामस्थांच्या वतीने गव्हाणे यांचा नुकताच सत्कार करण्यात आला. यावेळी शेतकरी संघटनेचे प्रवक्ते कार्लस साठे, माजी उपसरपंच राजेंद्र कोकणे, सत्कार करण्यात आला आहे,
0 Comments