दिलीप शिंदे
सोयगाव दि.०३--शेतातील वीज पंप बंद करण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्यांवर रानडुक्करने हल्ला करून लचके तोडल्याची घटना दि.०२ सोमवारी सायंकाळी पाच वाजेच्या दरम्यान घडली या घटनेत शेतकरी कैलास शिंदे(वय ४०) गंभीर जखमी झाले आहे. निमखेडी शिवारातील स्वतःच्या शेतातील गट क्र-७ मध्ये शेतात दबा धरून बसलेल्या रानडुक्करने अचानक हल्ला चढवीत लचके तोडून गंभीर जखमी केले आहे .
दरम्यान रानडुक्करने हल्ला चढविताच परिसरातील शेतकऱ्यांनी धाव घेवुन कैलास शिंदे यांना तातडीने पिंपळगाव( हरे) ता.पाचोरा येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. अद्यापही वनविभागाने घटनास्थळी पंचनामा केला नसल्याचे कैलास शिंदे यांनी प्रतिनिधींशी बोलतांना सांगितले. वनविभागाच्या निष्काळजी पनावर शेतकऱ्यांकडून रोष व्यक्त होत आहे
0 Comments