टाकळीभान जि. परिषद शाळांना ना. विखे यांच्याकडून चार इंटरऍक्टिव्ह बोर्ड भेट

दिलीप लोखंडे 

टाकळीभान प्रतिनिधी: जिल्हा परिषदेच्या शाळेतील मुलांना आधु‌निक व कॅम्प्यूटरव्दारे शिक्षण मिळावे व गावातील सर्व शाळा डिजीटल व्हाव्या या उद्देशाने गावातील प्रत्येक शाळांना ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या निधीतून चार जिल्हा परिषद शाळांना इंटर ऍक्टिव्ह बोर्ड भेट देण्यात आले. याचे उद्घाटन व वितरण माजी सभापती नानासाहेब पवार यांच्या हस्ते करण्यात आले. सदर वितरणाचा कार्यक्रम जि. परिषद वस्ती शाळा खंडोबा वाडी येथे संपन्न.

 झाला.यामध्येजि.प.शाळा-टाकळीभान ,जि.प.शाळा खंडोबा वस्ती जि.प. शाळा दाभाडे वस्ती, या जि. प. शाळा लक्ष्मीवाडी या चार जिल्हा परिषदेच्या शाळांना इंटरऍक्टिव्ह बोर्ड मिळाले.
           या कार्यक्रम याप्रसंगी बाबासाहेब बनकर, टाकळीभानचे उपसरपंच कान्हा खडागळे, नानासाहेब लेलकर,प्रवीण बनकर, प्रेमसिंग परदेशी, राजेंद्र देवळाकर, दत्तात्रय म्हस्के, जि प. केंद्र शाळेचे मुख्याध्यापक गायकवाड सर, लक्ष्मीवाडी जि. प. शाळेचे मुख्याध्यापक क्षीरसागर सर,दाभाडे वस्ती शाळेच्या मुख्याध्यापिका अवचट मॅडम, व खंडोबा वस्ती शाळेचे मुख्याध्यापक शिंदे सर उपस्थित होते. इंट्रेक्टीक बोर्ड मुळे विदयार्थी व पालक वर्ग यांच्या चेहन्यावर आनंद दिसून झाला. उपस्थित पालक आणि विदयार्थी यांनी ना. विखे साहेबांचे धन्यवाद मानले. या प्रसंगी खंडोबा वाडी वस्ती शाळेस सुरेश मुळे यांच्याकडून दोन पाण्याचे जार शाळेला भेट देण्यात आले. तसेच खंडोबावस्ती शाळेस अमोल पटारे यांच्या समन्वयातून ग्लोबल नगरी यांच्याकडून वाटर फिल्टर (RO) चे देखील उद्घाटन याप्रसंगी पार पडले. तर उपस्थितांचे आभार खंडोबावाडी जि प. वस्ती शाळेचे मुख्याध्यापक गोरक्षनाथ शिंदे यांनी मानले.

Post a Comment

0 Comments