भारतीय लहुजी सेना च्या वतीने प्रांत अधिकारी साहेब यांना निवेदन




श्रीरामपूर ( प्रतिनिधी)

    श्रीरामपूर शहर व तालुक्यातील रुग्णांची दवाखान्यात व लॅब मार्फत होणारी पिळवणूक थांबून स्वस्तदरात रुग्णांना वैद्यकीय सेवा देण्याबाबत व दर निश्चित दर्शनीय भागात लावण्याबाबत परिपत्रक जाहीर करावे शासनाचे निर्णयाप्रमाणे रुग्णांना सेवा न पुरवणाऱ्या डॉक्टर व लॅब चालकावर कायदेशीर कारवाई होणे बाबत दवाखान्यात तपासणी दरपत्रक लावले जात नसल्याने डॉक्टर कडून जादा फी ची मागणी करून रुग्णांची फसवणूक केली जाते .


डॉक्टर स्वतःच्या फायद्यासाठी सेवेच्या नावाखाली रक्त तपासती लॅब व फोटो स्कॅनर एक्स-रे या सुविधा आकारणी करून रुग्णांकडून जादा रक्कम वसुली होत असल्याने त्यांची चौकशी व्हावी या सर्व मागणीसाठी भारतीय लहुजी सेना च्या वतीने प्रशासकीय इमारत श्रीरामपूर येथील प्रांत अधिकारी साहेब यांना निवेदन देण्यात आले सदर निवेदन देण्यासाठी राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब बागुल राष्ट्रीय सचिव हनीफ भाई पठाण जिल्हाप्रमुख रज्जाक भाई शेख जिल्हा प्रसिद्धी प्रमुख रईस शेख, भाऊसाहेब आव्हाड, शांतवन खंडागळे, ताराचंद खंडागळे, अन्वर शहा,सिकंदर भाई तांबोळ रमजान शेख, अनिल रोकड़े,रोहन परदेशी , महमूद पठान,रमेज पोपटीया ,कमरान तांबोली, सागर चहापानेकर, राजेंद्र त्रिभुवन, नंदकुमार बगाडे, अधिक कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते 
लवकरात लवकर मागणी पूर्ण न झाल्यास भारतीय लहुजी सेना सर्व कार्यकर्ते पदाधिकारी घेऊन माननीय जिल्हाधिकारी साहेब व प्रांत अधिकारी साहेब यांच्या कार्यालय समोर उपोषण सुरू करेल असा इशारा भारतीय लहुजी सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब बागुल यांनी दिला.

Post a Comment

0 Comments