अहमदनगर जिल्हा मित्र मंडळ , पुणे या ट्रस्टचे नामांतरास विशेष सर्वसाधारण सभेत मंजूरी - साहेबराव खामकर

नंदकुमार बगाडे 


पुणे : अहमदनगर जिल्हा मित्र मंडळ , पुणे ही धर्मादाय आयुक्त कार्यालयाकडे नोंदणीकृत विश्वस्त व्यवस्था असून तिची सन १९९३ मध्ये नोंदणी करण्यात आली आहे. तथापि , महाराष्ट्र शासनाचे ८ ऑक्टोबर २०२४ रोजीचे अधिसूचने नुसार अहमदनगर जिल्ह्याचे नाव बदलून अहिल्यानगर झाले असल्यामुळे अहमदनगर जिल्हा मित्र मंडळ या संस्थेचे नाव देखील अहिल्यानगर जिल्हा मित्र मंडळ , असे करण्यात यावे , अशा प्रकारचा ठराव संस्थेच्या मागील वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये संमत झाला होता ,

 तो ठराव काल झालेल्या विशेष सर्वसाधारण सभेत कायम करण्यात आल्याचे अध्यक्ष साहेबराव खामकर यांनी सांगितले.संस्थेमार्फत राबविण्यात येत असलेल्या सामाजिक उपक्रमा बाबतची माहीती मार्गदर्शक विश्वस्त भास्करराव शेळके यांनी दिली.संस्थेचे वतीने नजीकच्या काळात एक सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात येणार असून मोफत फिजिओथेरपी शिबीर राबविण्यात येणार असल्याचे कोषाध्यक्ष साहेबराव मोरे पाटील यांनी सांगितले.या शिबीराचा गरजूंनी लाभ घ्यावा , असे आवाहन खामकर यांनी केले.या वेळी उपाध्यक्ष रावसाहेब सपकाळ यांनी मनोगत व्यक्त करीत उपस्थितांचे
आभार मानले.या कार्यक्रमास कार्यकारी मंडळाचे सदस्य सतीश राजहंस, बाळासाहेब वाफारे आदींसह प्रा.गहिनीनाथ हुमे , मकरंद सप्तर्षी व अन्य सभासद उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments