सावित्रीच्या लेकींना सक्षम बनण्याची संधी- डॉ. प्रसाद उंबरकर



 लोहगाव-(वार्ताहर )चूल आणि मूल ही संकल्पना आताच्या या समाजातून पूर्णपणे नष्ट झाली आहे. कारण अनेक समाजसुधारकांनी स्त्री शिक्षणाला पाठिंबा दिल्यामुळेच आजची स्त्री प्रत्येक क्षेत्रात स्वतः सक्षम बनत चालली आहे. असे प्रतिपादन संगमनेर येथील डॉ. प्रसाद उंबरकर यांनी केले. 
प्रवरानगर येथील महात्मा गांधी संकुलाच्या 
कन्या विभागातील एस.एस.सी परीक्षा विद्यार्थिनींचा शुभेच्छा चिंतन कार्यक्रम नुकताच आयोजित करण्यात आला होता. 
   याप्रसंगी रयत शिक्षण संस्थेचे, संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील आणि रयत माऊली लक्ष्मीबाई पाटील यांच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण करण्यात आली. यावेळी संकुलाचे प्राचार्य विनायक मेथवडे, उपमुख्याध्यापक दिलीप डहाळे, उपप्राचार्य संजय डुबे, पर्यवेक्षिका संगीता सांगळे, डॉ. शरद दुधाट, बाबासाहेब अंत्रे आदी मान्यवर उपस्थित होते. विद्यार्थिनींना मार्गदर्शन करताना डॉ.उंबरकर म्हणाले की, शिक्षकच आपले संस्काराची खरी शिदोरी आहे. आपल्या जीवनाची जडणघडण त्यांच्यामुळेच घडत असते. कारण आपले शिक्षक ज्ञानदानाबरोबर आपल्या भविष्याच्या दिशाही ठरवतात. याच संधीचा फायदा घेऊन विद्यार्थ्यांनी जीवनात खूप मोठे झाले पाहिजे. त्यातले त्यात मुलींनाही प्रत्येक क्षेत्रात सक्षम बनण्याची संधी आहे. त्यामुळेच आई वडिलांच्या नावाबरोबरच आपल्या शाळेचे आणि शिक्षकांचे ही नाव मोठे करा असे आव्हान डॉ.उंबरकर यांनी केले.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी कन्या विभागाच्या मुख्याध्यापिका नलिनी जाधव यांनी विद्यार्थिनींशी संवाद साधत जीवनात नेहमी सकारात्मक विचार करा असे सांगितले.
        या कार्यक्रमाप्रसंगी संचिता मेटे, प्रांजल पंडित, कीर्ती भोसले, हर्षदा दरंदले या विद्यार्थिनींनी आपले मनोगत व्यक्त केले तर शिक्षकांमधून संगीता उगले यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इयत्ता नववीच्या विद्यार्थिनी निशा चेचरे, बुशरा शेख व भाग्यश्री काळे यांनी केले. आभार माधुरी वडघूले यांनी मानले.
    कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी ज्येष्ठ शिक्षिका माधुरी वडघुले, संगीता उगले, विजयश्री कदम, शैलेजा सातपुते, प्रफुल्ल 
नव्हाळे, कमल थिटे, सुजाता ठाकरे, नंदादेवी बैसाणे, दिपाली आंबेकर, मीनाक्षी गांगुर्डे, प्रमिला पंडोरे आणि विलास गभाले यांनी परिश्रम घेतले.

Post a Comment

0 Comments