टाकळीभान प्रतिनिधी-महाराष्ट्र राज्याचे शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथ दादा पाटील व उपाध्यक्ष एडवोकेट अजित काळे यांचे सक्षम नेतृत्वाखालील शेतकरी संघटनेच्या अहिल्यानगर जिल्हा प्रभारी व प्रवक्तेपदी अशोक कारखान्याचे माजी संचालक प्रा कार्लस साठे सर यांची नुकतीच नियुक्ती झाली आहे
त्यांची सामाजिक बांधिलकी व शेतकऱ्यांच्या विविध प्रश्न संबंधी असणारी जाणीव तळमळ व समर्पित भावनेने काम करण्याची इच्छा याची दखल घेऊन नियुक्ती केलेली आहे .
शेतीमालाला रास्त भाव मिळवून देणे दूध दरवाढ शेतकऱ्यांच्या विषयी विविध प्रश्न सोडवणे इत्यादी कार्यक्रमासाठी शेतकऱ्यांची एकजूट घडवून आणून त्यांना आर्थिक दृष्ट्या सक्षम व स्वावलंबी बनविण्यासाठी प्रयत्नशील राहणे समृद्ध व सक्षम स्वयंपूर्ण भारत देश घडविण्यासाठी शेतकरी संघटनेने पुकारलेले न्यायिक आंदोलने यशस्वी करण्याचे प्रयत्न करणार असल्याचे कार्लस साठे यांनी एका पत्रकाद्वारे प्रसिद्ध केले आहे
या निवडीबद्दल रघुनाथ दादा पाटील एडवोकेट अजित काळे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे उपाध्यक्ष हरिआप्पा तूवर श्रीरामपूर तालुका अध्यक्ष युवराज जगताप नेवासा तालुका अध्यक्ष नरेंद्र काळे नेवासा तालुका युवा अध्यक्ष रोहित कुलकर्णी टाकळी भान येथील राजेंद्र कोकणे मित्र मंडळ बेलपिंपळगाव जिल्हा परिषद गटाचे उमेदवार बंडोपंत चौगुले शेतकरी संघटनेचे ज्येष्ठ नेते वसंतराव शेरकर खंडेराव सरोदे भास्कर तुवर बाळासाहेब शिरसाठ मेजर भाऊ गव्हाणे सुजित बोडखे शरद आसने बाबासाहेब रोटे मुमताज सय्यद भाऊराव तराळ नानासाहेब गारोळे संतोष डिके प्रभाकर पठारे किरण लंघे बाबासाहेब नागवडे दादासाहेब नाबदे इत्यादींनी अभिनंदन केले आहे,
0 Comments