महाशिवरात्रीनिमित्त शिर्डीत साई दर्शनाला भाविकांची गर्दी! संस्थांनच्या महाप्रसादालायात साबुदाणा खिचडीचा भाविकांना महाप्रसाद!

शिर्डी (प्रतिनिधी)-शिर्डी येथील
श्री साईबाबा संस्‍थान विश्‍वस्‍थव्‍यवस्‍थेच्या वतीने सालाबादप्रमाणे याही वर्षी महाशिवरात्री उत्‍सव साजरा करण्‍यात येत असून आज पहाटे ०५.१५ वाजता श्रींची काकड आरती संपन्न झाली.

 त्‍यानंतर सकाळी ०५.५० वाजता श्रींचे मंगलस्‍नान होवुन शिर्डी माझे पंढरपुर आरती झाली. यावेळी श्रींचे समाधी चौथ-यावर श्री शंकर भगवानांचा फोटो ठेवण्यात येवून श्री साईबाबांच्‍या मुर्तीस व समाधीवर बेलपत्राचा हार चढविण्‍यात आला. त्‍यानंतर ०६.२५ श्रींच्‍या दर्शनास प्रारंभ झाला. महाशिवरात्रीनिमित्‍त भाविकांच्‍या गर्दिने मंदीर व परीसर फुलुन गेला असून दुपारी १२.०० वाजता श्रींची माध्‍यान्‍ह आरती झाली. सायंकाळी ०६.१५ श्रींची धुपारती होऊन रात्रौ ०९.१५ वाजता श्रींचे पालखीची शिर्डी गावातुन मिरवणुक संपन्‍न होईल. पालखी समाधी मंदिरात परत आल्‍यानंतर श्रींची शेजारती होईल. रात्रौ १२.२८ ते रात्रौ ०१.१८ यावेळेत श्रींच्‍या गुरुस्‍थान मंदिरात रुद्राभिषेक पुजा होणार आहे. 
तसेच महाशिवरात्री निमित्‍त संस्‍थानच्‍या श्री साईप्रसादालयात अंदाजे ६० ते ६५ हजार साईभक्‍त मोफत प्रसादरुपी शाबुदाणा खिचडीचा लाभ घेतील असे नियोजन करण्‍यात आले असून याकरीता सुमारे ५५ पोते शाबुदाणा, ४००० किलो शेंगदाणे, ७०० किलो शेंगदाणा तेल व २००० किलो बटाटा वापरण्‍यात येईल. तर आज सकाळी सुमारे २७ हजार ५०५ नाष्‍टा पाकीटांचा साईभक्‍तांनी लाभ घेतला आहे. महाशिवरात्रीनिमित्त मोठ्या संख्येने साईभक्त शिर्डीत साई दर्शनाला आल्यामुळे शिर्डीत सकाळपासूनच आज गर्दी होती.

Post a Comment

0 Comments