अहिल्यानगर जिल्हा प्रतिनिधी
(प्रा ज्ञानेश्वर बनसोडे सर)
देवलाळी प्रवरा नगरपरिषदेणे नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभेमध्ये पाणीपट्टी 1800 वरून एकदम 3000 रुपये इतकी वाढ केली आहे. देवळाली नगरपरिषदेने ही जी अवाजवी व नागरिकांना न परवडणारी अश्या या पाणीपट्टी वाढीचा निर्णय घेतलेला आहे .
तो अन्यायकारक असा असून नागरिकांना तो परवडणारा असा नाही. कारण देवळाली प्रवरा नगर परिषद हद्दीतील असंख्य कुटुंबे ही हातावरची आहेत.मोलमजुरी करणारी आहेत. त्यातच वेळेवर रोजगार मिळेल च याची स्यास्वती नाही. मुलांचे शिक्षण. आरोग्य. व दैनंदिन जीवनातील कौटुंबिक अत्यावश्यक खर्च भागवता=भागवता जनता मेटाकुटीला आली आहे.
असे असतानाही देवळाली नगर परिषदेच्या सर्व साधारण सभेमध्ये पाणीपट्टी एकदम 1800 वरुनथेट 3000रू वाढीचा निर्णय हा योग्य नाही. ते अगदी नियम बाह्य आहे. या बाबत देवळाली प्रवरा नगर परिषदने गरीबांची हि हलाखीची परिस्थिती विचारात घेऊन सहकार्य करावे.
हा अवाजवी पाणी पट्टी वाढीचा निर्णय नागरिकांना परवडणारा असा नाही.. हा पाणीपट्टी वाढीचा घेण्यात आलेला निर्णय अन्याय कारक व बेकायदेशीर असा असल्यामुळें हा घेतलेला अन्याय कारक निर्णय तात्काळ रद्द करण्यात यावा यासाठी नगरसेवीका सुनिता सुरेंद्र थोरात यांनी देवळाली प्रवरा नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना 6 मार्च 2026 रोजी नगरपालिका समोर धरणेआंदोलन करण्याचा इशारा एका लेखी निवेदनाद्वारे दिला दिला आहे.
0 Comments