राजुरी (वार्ताहर)
रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी जगद्गुरु रामानंदाचार्य दक्षिणपीठ नाणिजधाम यांचा समस्या मार्गदर्शन व दर्शन सोहळा दिनांक 27 व 28 फेब्रुवारी 2026 सकाळी नऊ वाजता स्थळ हुतात्मा अनंत कान्हेरे मैदान गोल्फ क्लब सिविल हॉस्पिटल समोर नाशिक शहर नाशिक येथे संपन्न होत आहे सोहळ्याचे औचित्य साधून 27 फेब्रुवारी रोजी साधक दीक्षा आणि 28 फेब्रुवारी रोजी उपासक दीक्षा सुद्धा संपन्न होणार आहे.
जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्रचार्यजी जगद्गुरु रामानंदाचार्य दक्षिणपीठ नाणीजधाम यांच्या प्रेरणेने त्यांच्या मार्गदर्शनाखाली सामाजिक व आध्यात्मिक कार्य अविरत केले जातात त्यामध्ये विशेष म्हणजे देहदान आजपर्यंत 180 लोकांनी देहदान केले आहे व अवयवदान 133 लोकांनी अवयव दान केले आहे अपघातग्रस्त साठी महामार्गावर 53 ॲम्बुलन्स विनामूल्य सेवा देत आहेत सीबीएससी इंग्रजी माध्यमाचे शिक्षण विनामूल्य दिले जाते प्रत्येक वर्षी जीवनदान महाकुंभमार्फत 2025 मध्ये 137270 रक्त कुपिका आणि 2026 मध्ये 171150 रक्तकुपीका महाराष्ट्र शासनाच्या रक्त पेढीला देण्यात आले आहे वसुंधरा संवर्धन साठी जगद्गुरु रामानंदाचार्यजींचा जन्मोत्सव निमित्ताने 2 ऑक्टोबर ते २१ ऑक्टोबर एक पेड माके नाम उपक्रमांतर्गत 111140झाडे 2025 मध्ये लावण्यात आली आणि त्या झाडाची संगोपन करण्याचे कार्य सुरू आहे 4598 कच्चे बंधारे बांधून पाणी आडवा पाणी जिरवा हा संकल्प राबविण्यात आला अशा प्रकारे अनेक सामाजिक कार्य करण्यात येत आहेत अध्यात्म विज्ञान आणि व्यवहार या
त्रीसूत्रीच्या माध्यमातून माणसाच्या जीवनातील अडचणी कशा सुटतील व माणूस सुखी कसा होईल यावर जगद्गुरु श्रींचे मार्गदर्शन 27 आणि 28 फेब्रुवारी 2026 रोजी होणाऱ्या कार्यक्रम निमित्ताने होणार आहे आणि भाविकांना दर्शनाचा लाभ घेता येणार आहे भक्तगणांच्यासोयीसाठी मैदानावर भव्य मंडपाची उभारणी करण्यात आली आहे या ठिकाणी महाप्रसादाचे व्यवस्था असणार आहे अशा या होणाऱ्या भव्य जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या मार्गदर्शन व दर्शन कार्यक्रमाचा लाभ समस्त भक्तगणांनी घ्यावा असे आवाहन जगद्गुरु रामानंदाचार्य दक्षिण पिठाच्या उपपीठ उत्तर महाराष्ट्राच्या वतीने करण्यात येत आहे
आयोजक जगद्गुरु रामानंदाचार्य दक्षिण पीठ नाणिजधाम ,उपपीठ उत्तर महाराष्ट्र नाशिक.
0 Comments