टाकळीभान प्रतिनिधी—खुनाचा प्रयत्न केल्याचा व गेल्या एक वर्षापासून पोलीसांना हवा असणार्या फरार आरोपीला अखेर जेरबंद करण्यात श्रीरामपूर पोलीसांना यश आले आहे. अपर पोलीस अधिक्षक कार्यालयाकडून ही कामगिरी करण्यात आली.
याबाबतची सविस्तर माहीती अशी की, शुक्रवार दि.२३ रोजी सकाळी अपर पोलीस अधिक्षक सोमनाथ वाघचौरे यांना गुप्त बातमीदारामार्फत माहीती मिळाली की, श्रीरामपूर तालुका पोलीस स्टेशन गु.र.नं. २३५/२०२५ भारतीय न्याय संहिता कलम १०९, १८९(२), १८९(४), १९१(३), १९०, ३५१(२), ३५१(३), ३५२,३२४(४) आर्म अॅक्ट ४/२५ मधील फरार आरोपी संकेत सर्जेराव गायकवाड राहणार टाकळीभान हा श्रीरामपूर शहरात आलेला असल्याचे समजले. त्या अनूषंगाने अपर पोलीस अधिक्षक कार्यालयाचे पोहेकाॅ. दादासाहेब लोंढे, पो.ना.संदिप दरंदले, पो.काॅ.राजेंद्र बिरदवडे, सहदेव चव्हाण, अशोक गाढे यांच्या पथकाने शहरात सापळा रचून ताब्यात घेतले. सदर आरोपी संकेत गायकवाड याच्याकडे प्राथमीक चौकशी केली असता त्याने गुन्हा केल्याची कबूली दिली आहे. संबधित आरोपीस पुढील कारवाई करिता श्रीरामपूर तालुका पोलीस स्टेशनच्या ताब्यात दिले आहे.
सदरची कारवाई ही जिल्हा पोलीस अधिक्षक सोमनाथ घार्गे, अपर पोलीस अधिक्षक सोमनाथ वाघचौरे, उपविभागीय पोलीस अधिकारी जयदत्त भवर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे.
0 Comments