कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी सौ बेबीताई बाळासाहेब जपे तर आशा सुपरवायझर अमृता कचवे या प्रमुख पाहुण्या होत्या . प्रथम कर्मवीर भाऊराव पाटील व लक्ष्मीबाई भाऊराव पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. नंतर हळदीकुंकवाच्या सणाचे महत्त्व ,तो सण कसा साजरा करावा? यासोबतच महिलांनी आपल्या आरोग्याची काळजी कशी घ्यावी? आपला आहार कसा असावा? याविषयी सौ अमृता कचवे यांनी उपस्थित महिलांना मार्गदर्शन केले. सौ. रेखा सूर्यवंशी यांनी आहारासोबत आपलं स्वास्थ्य या विषयी तर श्रीमती सांगळे शीतल यांनी हळदी कुंकू व मकर संक्रांत यातील संबंध व भारतीय संस्कृतीतील महत्त्व सांगितले. श्रीमती कानडे मॅडम व इतर महिलांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या प्रसंगी सावळी विहीर आरोग्य केंद्रातील सर्व आशा, आरोग्य कर्मचारी यांच्या समवेत बालविवाह प्रतिबंधात्मक प्रतिज्ञा घेण्यात आली.विद्यालयातील मुख्याध्यापिका श्रीमती डहाळे मॅडम व श्रीमती कानडे मॅडम यांनी सर्व महिला भगिनींना हळदीकुंकू देऊन वाण देऊन त्यांचे आभार मानले. कार्यक्रमांमध्ये सावळीविहीर येथील ग्रा.प. सदस्या सौ शैला पवार, बेबीताई सोनवणे , पद्मावती कापसे तसेच मोठ्या संख्येने पालक वर्ग व प्राथमिक आरोग्य केंद्र सावळीविहीर येथील सर्व आशा कर्मचारी महिला भगिनी सह विद्यालयातील सर्व सेवक वृंद शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
शिर्डी ( प्रतिनिधी)-राहाता तालुक्यातील सावळीविहीर येथील न्यू इंग्लिश स्कूल या विद्यालयात नवीन वर्ष व मकर संक्रांत या सणाचे औचित्य साधून विद्यार्थिनी, शिक्षिका,महिलांचा, हळदी कुंकवाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला. हळद हे सौभाग्याचे तर कुंकू हे शक्तीचे प्रतीक आहे. माता भगिनींचे कृतज्ञता व्यक्त करण्याचा आजचा दिवस आहे .हळदी कुंकू कार्यक्रम म्हणजे महिलांनी गजबजलेली वादळवाट, अनुभवांची साठवण आहे.ब्रम्हांडाला उजळणारी ती परमेश्वराचे रूप आहे. असे यावेळी सांगत न्यू इंग्लिश स्कूल सावळीविहीर विद्यालयात हळदी कुंकवाचा कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी सौ बेबीताई बाळासाहेब जपे तर आशा सुपरवायझर अमृता कचवे या प्रमुख पाहुण्या होत्या . प्रथम कर्मवीर भाऊराव पाटील व लक्ष्मीबाई भाऊराव पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. नंतर हळदीकुंकवाच्या सणाचे महत्त्व ,तो सण कसा साजरा करावा? यासोबतच महिलांनी आपल्या आरोग्याची काळजी कशी घ्यावी? आपला आहार कसा असावा? याविषयी सौ अमृता कचवे यांनी उपस्थित महिलांना मार्गदर्शन केले. सौ. रेखा सूर्यवंशी यांनी आहारासोबत आपलं स्वास्थ्य या विषयी तर श्रीमती सांगळे शीतल यांनी हळदी कुंकू व मकर संक्रांत यातील संबंध व भारतीय संस्कृतीतील महत्त्व सांगितले. श्रीमती कानडे मॅडम व इतर महिलांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या प्रसंगी सावळी विहीर आरोग्य केंद्रातील सर्व आशा, आरोग्य कर्मचारी यांच्या समवेत बालविवाह प्रतिबंधात्मक प्रतिज्ञा घेण्यात आली.विद्यालयातील मुख्याध्यापिका श्रीमती डहाळे मॅडम व श्रीमती कानडे मॅडम यांनी सर्व महिला भगिनींना हळदीकुंकू देऊन वाण देऊन त्यांचे आभार मानले. कार्यक्रमांमध्ये सावळीविहीर येथील ग्रा.प. सदस्या सौ शैला पवार, बेबीताई सोनवणे , पद्मावती कापसे तसेच मोठ्या संख्येने पालक वर्ग व प्राथमिक आरोग्य केंद्र सावळीविहीर येथील सर्व आशा कर्मचारी महिला भगिनी सह विद्यालयातील सर्व सेवक वृंद शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
0 Comments