वेस्टर्न फॅशनला थेट आव्हान! नऊवारीत मराठी अटीट्युडचा जल्लोष – हर्षला पेंडसेचं दमदार गाणं लवकरच*!

साबळे ज्ञानेश्वर लोणी 

 लोणी/ प्रतिनिधी आजच्या काळात जिथे वेस्टर्न कपड्यांनाच फॅशनची ओळख मानली जाते, तिथे मराठमोळ्या नऊवारीचा ठसा उमटवत अभिनेत्री हर्षला पेंडसे हिने मराठी मुलीचा बाणेदार अटीट्युड जगासमोर ठणकावून मांडला आहे.
नऊवारी नेसून, डोळ्यात आत्मविश्वास, चालण्यात स्वॅग आणि चेहऱ्यावर अभिमान—ही साधी मुलगी नाही, ही आहे मराठी मातीची पोरगी! 
या गाण्यातून हर्षला पेंडसे हिने स्पष्ट संदेश दिला आहे की,
“फॅशन म्हणजे वेस्टर्नच असं नाही… आपल्या नऊवारीतही क्लास, ग्लॅमर आणि अटीट्युड ओसंडून वाहतो!”
“मी मराठी आहे” हे ओरडून सांगावं लागत नाही—तो स्वाभिमान तिच्या नजरेतूनच झळकतो! 
हे गाणं केवळ पोशाखावर नाही, तर मराठी मुलीच्या आत्मसन्मानावर, बाणेदार स्वभावावर आणि संस्कृतीशी असलेल्या नात्यावर भाष्य करतं. परंपरा जपत स्टाईल कशी मारायची, हे या गाण्यात ठसकेबाज पद्धतीने मांडण्यात आलं आहे.
या दमदार गाण्याचं दिग्दर्शन ऍड. प्राजक्ता घोलप यांनी केलं असून, निर्माते आबा निर्मळ हे आहेत. सहनिर्मितीची जबाबदारी पुजा जोशी महिदा यांनी समर्थपणे सांभाळली आहे.गाण्याची निर्मिती वनिता निर्मळ यांची असून, मेकअपची जबाबदारी वर्षा गाढवे यांनी घेतली आहे.
आणि अर्थातच, या गाण्याची खरी जान—अभिनयात झळकणारी हर्षला पेंडसे!
यावेळी बोलताना हर्षला पेंडसे म्हणाल्या की,
“मराठी परंपरा आणि पोशाख मुलींनी अभिमानाने जपावा. वेस्टर्न कपड्यांपेक्षा आपली नऊवारी किती गोड, रुबाबदार आणि अटीट्युडमध्ये दिसते, हेच या गाण्यातून दाखवण्याचा प्रयत्न आहे.”
निर्माते आबा निर्मळ यांची नाळ नेहमीच मराठी संस्कृतीशी जोडलेली असून, अशा आशयघन आणि संस्कृती जपणाऱ्या गाण्यांच्या माध्यमातून ते आपली परंपरा जिवंत ठेवण्याचा प्रयत्न करत असल्याचं पुन्हा एकदा दिसून येतं.
मराठी अटीट्युड, देशी स्वॅग आणि परंपरेचा अभिमान घेऊन येणारं हे गाणं लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. पत्रकार ज्ञानेश्वर साबळे यांनी मराठी माणसाचा स्वाभिमान वाढवणारं हे गाणं नक्कीच चर्चेत राहणार, यात शंका नाही! असा विश्वास व्यक्त केला

जय मराठी 🚩
जय महाराष्ट्र 💥

Post a Comment

0 Comments