शिर्डी येथील साईबाबा इंग्लिश मिडियम स्कूलच्या विद्यार्थ्याचे जिल्हास्तरीय विज्ञान-गणित प्रदर्शनात उज्वल यश!

राजकुमार गडकरी 



शिर्डी ( प्रतिनिधी)- श्री साईबाबा इंग्लिश मिडियम स्कूल, शिर्डी (प्राथमिक विभाग) यांनी जिल्हास्तरीय विज्ञान-गणित प्रदर्शनात उल्लेखनीय यश संपादन केले आहे. जिल्हा परिषद अहिल्यानगर, पंचायत समिती अकोले व विज्ञान-गणित अध्यापक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ५३ वे जिल्हास्तरीय विज्ञान-गणित व पर्यावरण प्रदर्शन (सन २०२५–२६) हे श्री नागेश विद्यालय, जामखेड येथे संपन्न झाले असून या प्रदर्शनात अहिल्यानगर जिल्ह्यातील सुमारे २३४ उपकरणे सहभागी झाली होती. 

या स्पर्धेत श्री साईबाबा इंग्लिश मिडियम स्कूल, शिर्डीच्या प्राथमिक विभागातील इयत्ता सहावीचा विद्यार्थी चि. साई विलास सिनगर याने ‘ग्रीन एनर्जी’ या विषयावर आधारित उपकरण सादर करून विज्ञान-गणित प्रदर्शनात द्वितीय क्रमांक पटकावला असून त्याची नागपूर येथे होणाऱ्या राज्यस्तरीय विज्ञान-गणित प्रदर्शनासाठी निवड झाली आहे. या प्रकल्पासाठी त्याला विज्ञान शिक्षक श्री. अमोल निर्मळ यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. प्रदर्शनाचा समारोप व बक्षीस वितरण समारंभ मा. ना. राधाकृष्ण विखे-पाटील, जलसंपदा मंत्री, महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री, अहिल्यानगर यांच्या शुभहस्ते पार पडला. या यशाबद्दल विद्यार्थी चि. साई विलास सिनगर व संबंधित शिक्षकांचे संस्थांनच्या अध्यक्षा न्या. अंजू शेंडे-सोनटक्के, जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर , उपमुख्य कार्यकारी अधिकारी भिमराज दराडे, प्रशासकीय अधिकारी अतुल वाघ, मुख्याध्यापिका सौ. शिल्पा पुजारी, प्राचार्य आसिफ तांबोळी, राहता गटशिक्षणाधिकारी राजेश पावसे यांनी अभिनंदन केले आहे.

Post a Comment

0 Comments