वडाळा पाटबंधारे उपविभाग, श्रीरामपुर अंतर्गत असलेली कारेगाव पाटबंधारे शाखा सेवानिवृत्त अधिकारी व कर्मचाऱ्यांचा स्नेहबंध मेळावा.

दिलीप लोखंडे 

टाकळीभान प्रतिनिधी-कारेगांव पाटबंधारे शाखेचे कर्मचारी बाळासाहेब बाबुराव कोकणे हे ३३ वर्षाच्या प्रदिर्घ सेवेनंतर चौकीदार पदावरुन सेवानिवृत्त झाले. त्यांच्या सेवानिवृत्तीचे औचित्य साधुन कारेगांव सिंचन शाखेमध्ये कार्यरत असणारे अधिकारी व कर्मचारी यांच्या पुढाकाराने सन १९७३-७४ पासुन सेवेत असलेल्या सेवानिवृत्त अधिकारी व कर्मचाऱ्यांना आमंत्रित करुन स्नेहबंध मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. 

हा मेळावा मध्ये मोठ्या उत्साहाच्या वातावरणात पार पडला. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान अभिषेक पवार उपविभागीय अधिकारी यांनी भुषविले. अ. ल. खैरे (सेवानिवृत्त उपविभागीय अधिकारी), अ. जी. भोंगळ (सेवानिवृत्त उपविभागीय अधिकारी) व्ही. एस. कोतकर (सेवानिवृत्त शाखाधिकारी) तसेच पटारे (सेवानिवृत्त शाखाधिकारी) बी. व्ही. घोरपडे (सेवानिवृत्त शाखाधिकारी) तसेच इतर मान्यवर व सेवानिवृत्त कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कारेगांव सिंचन शाखेच्या वतीने आयोजीत करण्यात आलेला हा स्नेह संमेलनामुळे भुतपर्व व वर्तमान कर्मचाऱ्यांमधील आपुलकी अधिक दृढ झाली. तसेच अनुभवांचे आदान प्रदान होऊन शासकिय सेवेतील मुल्ये जपण्याचा एक सुत्य प्रयत्न करण्यात आला. न भुतो न भविष्यती असा उपक्रम सामाजिक बांधिलकीची जपणरा ठरला.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कारेगांवचे शाखाधीकारी प्रविण भांगरे, शंतनु मारोडे तसेच शिवाजी तोरणे कालवा निरिक्षक, श्रीमती. निलम शेख कालवा निरिक्षक, मोहन सुंदर्ड कालवा निरिक्षक, प्रशांत खोत कालवा निरिक्षक, गणेश गाडेकर मोजणीदार तसेच संभाजी रभाजी तोरणे मोजणीदार यांनी विशेष परिक्षम घेतले. कारेगांव सिंचन शाखेने सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांसाठी आयोजीत केलेल्या या स्नेहमेळाव्याची श्रीरामपुर तालुक्यात मोठयाप्रमाणावर चर्चा होत आहे.

Post a Comment

0 Comments