आज दिनांक 31 रोजी तहसीलदार गंगापूर यांना निवेदन भेंडाळा व जामगाव मंडळातील संपूर्ण गंगापूर तालुक्यातील शेती पिकाचे शंभर टक्के नुकसान झालेले आहे तरी राहिलेले शेतकऱ्याचे अतिवृष्टीचे ,पीक विम्याचे ,अनुदान व घरात पाणी शिरले घर पर पडझडीचे ,व विहीर ढासाळल्याचे, पैसे तात्काळ लाभार्थ्याच्या खात्यावर टाकावे अतिवृष्टी मुळे शेतकरी खूप अडचणी सापडलेला आहे शासनाने सर्व शेतकऱ्यांचे व लाभार्थ्याचे पैसे दिवाळीपूर्वीच मदत दिली जाईल अशी घोषणा केली होती परंतु दिवाळी ही अंधारात गेली.
शेतकऱ्यांच्या पिकावर पाण्याचा थर साचून पिके वाहून गेली व पिकाचे अतोनात नुकसान झाले कापूस मका सर्व पिके निस्तानाबुत झाली आहे भरपूर ठिकाणी संपूर्ण गावे वस्त्या पाण्याखाली जाऊन संसार उपयोगी वस्तू पाण्यात वाहून गेले आहे शेतकऱ्यांच ते पीक नव्हतं ते शेतकऱ्याचे स्वप्न कष्ट लेकराची शाळेची फी लेकी बाळीचे लग्न अशी शेतकऱ्यांची व्यथा आहे तरी अनुदानाचे पीक विम्याचे घराचे पटझरीचे विहीर ढासळल्याचे पैसे 12 जानेवारी च्या आत लाभार्थ्याच्या खात्यावर टाकावे नसता कायगाव गोदावरी नदीमध्ये 12 जानेवारी वेळ अकरा वाजता सामूहिक जलसमाधी आंदोलन करण्यात येईल याची सर्वस्वी जबाबदारी आपली राहील असे पत्र तहसीलदार व कृषी अधिकारी यांना देण्यात आले याच्या आधीही 29 9 2025 व 30 10 2025 रोजी मा तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले होते .
यावेळी शेतकरी व लाभार्थी भाऊसाहेब गवळी बापूसाहेब गायकवाड कायगाव विविध सोसायटी चेअरमन संजय गायकवाड गंगापूर सहकारी साखर कारखाना संचालक चांगदेव आप्पा गायकवाड माजी पोलीस पाटील बाळकृष्ण गायकवाड रामदास माने माजी सरपंच सोमनाथ गायकवाड सदानंद गायकवाड अशोक मोरे वीर शंभू संघटना अध्यक्ष संभाजी पाटील वीर शंभू संघटनेचे संघटक बबन इथापे ज्ञानेश्वर गायकवाड सुरेश मिसाळ भागचंद नजन नामदेव कान्हे बाळासाहेब नजर संतोष गायकवाड आकाश माने नारायण वायसळ रोहिदास गावंडे सुनील निरफळ बाबासाहेब गायकवाड बालचंद बिरुटे संतोष पंडुरे कासम पटेल सतीश गायकवाड विजय बिरुटे अनिल गायकवाड रामेश्वर गायकवाड अनिल कान्हे शेखर पा गायकवाड आधी शेतकरी व लाभार्थी यांच्या सह्या आहेत.
0 Comments