दिलीप शिंदे
सोयगाव दि.२३ -- सोयगाव तालुक्यातील सावळदबारा येथील सामाजिक कार्यकर्ते रहिमखान पठाण यांची छत्रपती संभाजीनगर जिल्हा भारतीय जनता पार्टी अल्पसंख्यांक मोर्चा जिल्हा उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली.
नियुक्तीचे पत्र भाजपा प्रदेशाध्यक्ष अल्पसंख्यांक मोर्चा यांच्याहस्ते रहिमखान पठाण यांना देण्यात आले. यावेळी जयप्रकाश चव्हाण, भाऊराव कोलते, उत्तम चव्हाण, विनोद टिकारे, दादाभाऊ, प्रदीप चव्हाण, मनोज बुढाळ, रामचंद्र चिमणकर, संजय चव्हाण,गजानन चव्हाण, सुरज ठाकूर आदींसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.अल्पसंख्यांक समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी व पक्ष संघटन अधिक बळकट करण्यासाठी प्रामाणिकपणे कार्य करण्याचा निर्धार रहिमखान पठाण यांनी यावेळी व्यक्त केला.दरम्यान नवनिर्वाचीत जिल्हा उपाध्यक्ष रहिमखान पठाण यांचा सत्कार करण्यात आला.भाजपाच्या आजीमाजी पदाधिकाऱ्यांनी शुभेच्छा दिल्या.
0 Comments