दिलीप शिंदे
सोयगाव दि.२२-सोयगाव येथील अजंता व्हॅली इंग्लिश स्कूल येथे दि.२२ सोमवारी विज्ञान प्रदर्शन आणि स्टुडंट्स लेड कॉन्फरन्स घेण्यात आले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा.डॉ.सुशील जावळे आणि प्रमुख पाहुणे डॉ. रघुनाथ फुसे,.संजय शहापूरकर ,संजय पाटील (ग.शि.कार्यालय) सुनील शेटे, भास्कर पिंगाळकर, डॉ.दिनकर पिंगlळकर , डॉ.स्वाती पिंगlळकर , मुख्याध्यापिका मिनाक्षी रोकडे होते.
कार्यक्रमाचे प्रस्ताविक शाळेच्या संचालिका डॉ. स्वाती पिंगlळकर यांनी केले . कार्यक्रमांचे सूत्रसंचालन सोनाली बागुल आणि आभार प्रदर्शन पूजा दामोधर यांनी केले. शाळेत अश्या प्रकारचे कार्यक्रम घेतल्या मुळे विद्यार्थ्याचा बौद्धिक विकास होतो, त्याला पुस्तक व्यतिरिक्त ज्ञान प्राप्त होते, त्याची अभ्यास बद्दल रूची वाढते, जिज्ञासू वृत्ती वाढते आणि ह्याच्या मुळे विद्यार्थ्याचा आत्मविश्वास वाढतो असे शाळेतील संचालिका डॉ. स्वाती पिंगlळकर यांनी प्रास्ताविक करतांना सांगीतले. अध्यक्ष प्रा.डॉ. सुशील जावळे यांनी विद्यार्थ्याला विज्ञानाचे आता पर्यंत जे पण काही शोध लागेल आहेत त्याचे चांगले आणि वाईट परिणाम दोघंही बद्दल सविस्तर महिती दिली. कार्यक्रमा मध्ये शाळेतील नर्सरी ते ७ वी वर्गा पासुन सर्व विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने भाग घेतला होता. कार्यक्रमा मध्ये विद्यार्थ्यांनी चांद्रयान, बुलडोझर, भूकंप सूचक यंत्र, ए टी एम मशीन , रेन वॉटर हार्वेस्टिंग मॉडेल, वॉटर प्युरिफायर असे विविध मॉडेल बनवले असे १०० विविध प्रकारचे प्रयोग दाखवून विद्यार्थ्यांनी प्रमुख पाहुणे तसेच पालकांची मने जिंकली.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेतील शिक्षिका प्रियांका रोकडे, सीमा भामरे, सोनालीबागुल, दीक्षा पवार,पूजा दामोधर, रुपाली गोल्हरे, शीतल कटोले, शिक्षक रामचंद्र लाडकर यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने पालकांची उपस्थिती होती.
0 Comments