शिर्डी (प्रतिनिधी)-शिर्डीत साई चरणी विविध प्रकारचे दान साईभक्त देणगी स्वरूपात देत असतात. त्यामध्ये वेगवेगळी नविन वाहनेही देत असतात. अशाच प्रकारे कर्नाटक राज्यातील बेंगळुरू येथील साईभक्त व्यंकट सुब्रमण्यम व्यंकटकृष्णन यांच्या देणगीतून अपंग व वृद्ध साईभक्तांच्या सोयीसाठी मैनी कंपनीची M11 इलेक्ट्रिक बग्गी श्री साईबाबा संस्थानला देणगी स्वरूपात प्राप्त झाली आहे.
या नवीन वाहनाची या देणगीदार साईभक्तांच्या हस्ते विधीवत पूजा करण्यात आल्यानंतर त्यांनी सदर इलेक्ट्रिक बग्गीची चावी संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांच्याकडे सुपूर्द केली. यावेळी संस्थानचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. भिमराज दराडे, प्रशासकीय अधिकारी श्री. संदीपकुमार भोसले व श्री. अतुल वाघ आदी उपस्थित होते.
ही पर्यावरणपूरक इलेक्ट्रिक गाडी अपंग व वृद्ध साईभक्तांच्या सुविधेसाठी उपयुक्त ठरणार आहे. त्यामुळे अशा साई भक्तांमधून समाधान व्यक्त होत आहे.
0 Comments