शिर्डी (प्रतिनिधी)- जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा गणेशनगर तालुका राहता या शाळेत नेहमी उच्चांकी लोकसहभाग मिळत असतो, त्याप्रमाणे नुकतेच ठाणे येथील त्रिशा फाउंडेशन यांच्यातर्फे शाळेतील इयत्ता पहिली, दुसरीच्या मुलांना 50 स्कूल बॅग तसेच इयत्ता सातवीच्या मुलांना रायटिंग पॅड आणि उच्च प्राथमिक मुलींना सॅनिटरी नॅपकिनचे वाटप करण्यात आले,
त्यावेळी त्रिशा फाउंडेशनचे सर्वेसर्वा जयेश बेहेडे, मिलन बेहेडे, आणि त्रिशा बेहेडे उपस्थित होते. आतापर्यंत त्रिशा फाउंडेशनने शिर्डीचे साईबाबा यांच्या श्रद्धा आणि सबुरीचा मंत्र घेऊन परिसरातील अनेक शाळांना व गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप केलेले आहेत. त्याचप्रमाणे विविध शैक्षणिक उपक्रम देखील घेऊन विद्यार्थ्यांना मोफत मार्गदर्शन केले आहे. खेड्यातील असंख्य गोरगरीब मुलांना प्रत्यक्ष भेटून मदत करणे यात आम्हाला खरी साई सेवा दिसते ,असे कार्यक्रमाच्या वेळी जयेश बेहेडे यांनी सांगितले. कार्यक्रमाच्या प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक संजय घोलप यांनी पाहुण्यांचे स्वागत केले, तसेच शाळेच्या विविध उपक्रमांची माहिती श्री कैलास चिंधे यांनी दिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दत्ता गायकवाड यांनी तर आभार रोशन धनवटे यांनी मानले. सदरचा कार्यक्रम यशस्वीतेसाठी शाळेतील ज्येष्ठ शिक्षिका सुनीता गागरे ,मनीषा निर्मळ ,सोनल भावसार, व्हेरोणिका गायकवाड, सुनील गायकवाड यांनी प्रयत्न केले. शाळेतील या उपक्रमाचे गटशिक्षण अधिकारी राजेश पावसे, विस्तार अधिकारी विष्णू कांबळे व भाऊसाहेब घोरपडे आणि केंद्रप्रमुख सोमनाथ वैद्य तसेच गणेशनगर येथील सर्व स्थानिक पदाधिकारी यांनी अभिनंदन केले.
0 Comments