नाताळ सुट्ट्यामुळे शिर्डीत वाढली साई भक्तांची गर्दी!

शिर्डी (प्रतिनिधी)-सरत्या वर्षाला निरोप व नवीन वर्षाच्या स्वागतासाठी अनेक साईभक्त, पदयात्री शिर्डीत साई दर्शनासाठी येत असून शिर्डीत साई भक्तांची मोठी गर्दी होत आहे.त्यात सध्या शिर्डी व परिसरात थंडीचा जोर वाढला असून साईभक्त व साई पदयात्रींनाही या थंडीचा सामना करावा लागत आहे.रात्रीच्या वेळी शिर्डी शहरासह ग्रामीण भागात ठिकठिकाणी , वाड्या वस्त्यांवर शेकोट्या पेटल्याचे दिसून येत आहे.

 त्याचप्रमाणे स्वेटर ,कानटोप्या,मफलर, यांची दुकानेही रस्त्याच्या कडेला थाटल्याचे दिसून येत आहे. सध्या हिवाळा ऋतू सुरू असून गेल्या आठ दहा दिवसापासून शिर्डी व परिसरात थंडीचा कडाका वाढला आहे. या गुलाबी थंडीतही शिर्डीमध्ये डिसेंबर महिना असल्यामुळे व शनिवार, रविवार सुट्टी असल्यामुळे साई भक्तांची गर्दी होताना दिसत आहे. येथे दिवसभर स्वेटर कानटोपी घालून फिरताना साईभक्त दिसत आहेत. तसेच येथे येणाऱ्या साई पालखीतील पदयात्री स्वेटर,मफलर घालून शिर्डी कडे येत आहेत. शिर्डी शहरातील दुकानदार , हॉटेलवाले, वाहन चालक-मालक ,कामगार, सर्वजण स्वेटर मफलर घालूनच दिसत आहेत.शिर्डी सह परिसरातील ग्रामीण भागामध्येही रात्रीच्या शेकोट्या पेटल्याचे, त्याचप्रमाणे कपाटात असणारे उबदार कपडे, स्वेटर मफलर कानटोप्या आता बाहेर निघालेले आहेत. कपड्यांच्या दुकानात व रस्त्याच्या कडेलाही अनेक स्वेटर, मफलर, कानटोप्या विक्रीते दुकाने, स्टॉल थाटून बसल्याचे दिसून येत आहे.कडाक्याच्या थंडीमुळे मात्र लहान मुले व वृद्ध सर्दी पडसे खोकला आदी आजाराने त्रस्त होत आहेत. त्यामुळे शिर्डी व परिसरातील छोटे-मोठे दवाखाने रुग्णांनी गजबजल्याचे चित्र सध्या आहे. तर काही जण या गुलाबी थंडीचा आस्वाद घेण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी सहलीवर गेले आहेत तर काही सहलींचे आयोजन करत असल्याचे दिसून येत आहे.शिर्डीत डिसेंबर व जानेवारी महिन्यामध्ये साईभक्तांची गर्दी वाढत असते. तशी हळूहळू गर्दी वाढण्यास सुरुवात झाली आहे.नाताळातील सुट्ट्या व नवीन वर्षाच्या स्वागतासाठी शिर्डीत साई भक्तांची मोठी गर्दी होत आहे. दरवर्षीप्रमाणे 31 डिसेंबरला रात्रभर साई मंदिर दर्शनासाठी उघडे राहणार आहे. 31 डिसेंबर जवळ येत असल्यामुळे गर्दी वाटत आहे.त्यात थंडीचे प्रमाण वाढले आहे.त्यामुळे आता शिर्डीतील सर्व हॉटेल ,लॉज ,रेस्टॉरंट यांनी होणाऱ्या संभाव्य गर्दी लक्षात घेऊन त्याप्रमाणे विद्युत रोषणाई व आकर्षक सेवा सुविधा भक्तांसाठी हळूहळू सुरू करण्यास सुरुवात केली आहे. शिर्डीत अनेक पालख्या दाखल होत असून एसटी, रेल्वे ,विमाने तसेच खाजगी वाहनातून साईभक्त मोठ्या संख्येने साई दर्शनासाठी शिर्डीत येत आहेत. रविवार असल्याने शिर्डीमध्ये आज मोठी गर्दी दिसून येत होती.नगर मनमाड महामार्गावर साई भक्तांच्या वाहनांची मोठी वर्दळ वाढली आहे. नवीन वर्षाच्या स्वागतासाठी अनेक हॉटेल रेस्टॉरंट सज्ज झाले असून सर्वत्र आकर्षक विद्युत रोषणाईने साईनगरी सजवून गेल्याचे दिसत आहे.

Post a Comment

0 Comments