सत्तेचा महासंग्राम न्यूज ( डिजिटल मिडिया)
अपहरण झालेल्या आदिवासी भिल्ल समाजाच्या अल्पवयीन मुलीचा नेवासा पोलिसांनी तत्काळ शोध घेऊन आरोपीवर कायदेशीर कारवाई करावी अन्यथा सोमवार दिनांक 29 डिसेंबर रोजी नेवासा पोलीस स्टेशन समोर आदिवासी बचाव समितीचे संस्थापक सदस्य शिवाजीराव गांगुर्डे व कैलासदादा माळी यांच्या नेतृत्वाखाली आदिवासी भिल्ल समाजातील मुलीचे सर्व नातेवाईक बेमुदत आमरण उपोषणास बसतील असा इशारा एकलव्य भिल्ल सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष ज्ञानेश्वर अहिरे यांनी दिला आहे.
. श्री. अहिरे यांनी म्हटले आहे की , नेवासा तालुक्यातील सलाबतपुर येथील आदिवासी भिल्ल समाजातील अल्पवयीन मुलगी मयुरी गणेश गायकवाड हिचे दिनांक 17 नोव्हेंबर रोजी नेवासा फाटा आयटीआय कॉलेज येथून अपहरण झाले तशी फिर्याद नेवासा पोलीस स्टेशन मध्ये एक डिसेंबर रोजी दाखल करण्यात आली. मुलीचे वडील गणेश एकनाथ गायकवाड व मुलीची आई तारामती गणेश गायकवाड यांनी आरोपीची नावे देखील पोलिसांना सांगितली परंतु जवळपास दीड महिना झाला तरी पोलिसांनी मुलीचा शोध लावलेला नाही. मुलगी अल्पवयीन असतानाही जानीवपूर्वक पोलिसांनी पोस्को अंतर्गत पुन्हा दाखल केला नाही. त्यामुळे नेवासा पोलीसच आरोपीला पाठीशी घालत आहेत की काय असा संशय बळावला आहे. ही आदिवासी मुलगी अल्पवयीन आहे त्यामुळे तिच्या जीवितस धोका असतानाही पोलीस गप्प का आहेत असा प्रश्न निर्माण झाला आहे. आज मुलीचे आई-वडील यांनी नेवासा पोलिसांना आरोपींची नावे व पत्ता लेखी स्वरूपात दिलेला आहे.
नेवासा पोलिसांनी तात्काळ आरोपीचा शोध घ्यावा अन्यथा सोमवारपासून आदिवासी मुलीचे सर्व कुटुंबीय नेवासा पोलीस स्टेशन समोर आदिवासी बचाव समितीचे संस्थापक सदस्य शिवाजीराव गांगुर्डे, कैलासदादा माळी यांच्या नेतृत्वाखाली बेमुदत आमरण उपोषण सुरू करतील या उपोषणाची संपूर्ण जबाबदारी नेवासा पोलीस स्टेशनवर असेल असा इशारा ज्ञानेश्वर अहिरे यांनी दिला आहे.
0 Comments