कवली येथे मराठा प्रतिष्ठानच्या वतीने हरिपाठाचे पुस्तके व ब्लँकेटचे वाटत --



दिलीप शिंदे 
सोयगाव दि.२८--सोयगाव तालुक्यातील कवली येथे मराठा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष सोपान गव्हांडे यांच्या हर घर हरिपाठ या संकल्पनेतून दि.२७ शनिवारी भागवत सप्ताह निमित्ताने अत्यंत स्तुत्य व सामाजिक बांधिलकी जपणारा उपक्रम राबविण्यात आला. यावेळी कवली गावातील जेष्ठ,वयोवृद्ध,नागरिक व महिला अशा आठशे जणांना हरिपाठ पुस्तक व ब्लँकेटचे वाटप करण्यात आले. 

या उपक्रमामुळे कवली गावात समाधान व आनंदाचे वातावरण निर्माण झाले. या कार्यक्रम ह.भ.प. चंद्रकांत महाराज साक्रीकर, मराठा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष सोपान गव्हाडे पाटील, माजी सभापती चंद्रकांत पाटील, मराठा प्रतिष्ठानचे जिल्हाध्यक्ष विजय काळे, तालुकाध्यक्ष विजय चौधरी यांची प्रमुख उपस्थितीत होती. यावेळी गलवाडा च्या माजी सरंपच सुरेखा ताई तायडे,घोसला सरपंच गणेश माळी,कवली सरपंच वसंत बनकर, उपसरपंच ज्योती मंगेश पाटील, पोलीस पाटील निवृत्ती केंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.यावेळी मराठा प्रतिष्ठानचे सदस्य रवी पाटील, दिनेश पाटील,योगेश पाटील, भीमराव पाटील,मनोज खोसे, अमोल पंडित,राहुल तराळ, ज्ञानेश्वर तराळ,युवराज पाटील, किशोर पाटील,प्रमोद वाघ, ज्ञानेश्वर युवरे, गणेश माळी, तिडका येथील मुजीफ पटेल, वाकडी येथील कृष्णा धुमाळ, उपलखेडा येथील गोपाल पाटील, सोनू तडवी,जरडीचे सचिन महाजन,सुनिल तिडके,चेतन पाटील आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वितेसाठी मराठा प्रतिष्ठानच्या सदस्यांनी परिश्रम घेतले.

Post a Comment

0 Comments