दिलीप शिंदे
सोयगाव दि.१७-- सोयगाव तालुक्यातील बनोटी येथील जिल्हा परिषद प्रशालेत अंगणवाडी सेविकांकडून बालविवाह निर्मुलन कार्य शाळेचे दि.१७ बुधवारी आयोजन करण्यात आले होते. यावेळी विद्यार्थ्यांना बालविवाह प्रतिबंध कायदा, सुव्यवस्था व त्याचे होणारे दुष्परिणामाविषयी सखोल मार्गदर्शन करण्यात आले. बालविवाहामुळे होणारे शैक्षणिक नुकसान, सामाजिक व शारीरिक नुकसान विषयी विद्यार्थ्यांना अंगणवाडी सेविकेने मार्गदर्शन केले.
बालविवाह हा कायदेशीर गुन्हा असून शासनाने त्यासाठी शिक्षेची तरतूद केली आहे.बालविवाह होत असल्यास त्याची माहिती संबंधित विभागाला द्यावी असे आवाहन करण्यात आले. माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल. दरम्यान उपस्थितांसह विद्यार्थ्यांना बालविवाह प्रतिबंध प्रतिज्ञा घेण्यात आली. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक आर.डी.सोनवणे,अंगणवाडी सेविका देवकन्या चौधरी,कविता शिंदे, रत्ना जाधव,निर्मला राठोड,अनिता कुंभार, लता वाघ,शाळेचे शिक्षक जगदीश जगताप, गिरीष बोरसे, धनंजय नलवडे, ब्रिजवाल पाटील,राजेंद्र नगरे, दिलीप कुंभार,मयुर काळे,प्रिया पेटकर,मंगला कोळी,सुनील गायकवाड,सुरेश राऊत यांच्यासह शाळेतील विद्यार्थी उपस्थित होते.
0 Comments