लोकनेते सहकारमहर्षी कै. बाबुरावजी काळे यांचे वेताळवाडी मध्यम प्रकल्प फलकावरील पुसले नाव आहे त्याच स्थितीत --





दिलीप शिंदे 
सोयगाव दि. १७- वेताळवाडी मध्यम प्रकल्प जलाशयाला सोयगाव तालुक्याचे भाग्यविधाते लोकनेते, सहकारमहर्षी कै. बाबूरावजी काळे यांचे फलकावरील नाव पुसल्याचा धक्कादायक प्रकार काही महिन्यापूर्वी उघडकीस आला होता. कै बाबूरावजी काळे यांचे नाव असलेल्या जलाशयाचे फलक आज ही आहे त्या स्थितीत असल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे. लोकनेते सहकारमहर्षी बाबूरावजी काळे वेताळवाडी जलाशय फलक कोण सुस्थिती करणार असा प्रश्न नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे.
      याबाबत सविस्तर माहिती अशी लोकनेते तालुक्याचे भाग्यविधाते व वेताळवाडी धरणाचे निर्माते सहकारमहर्षी कै. बाबुरावजी काळे यांच्या कार्याचा गौरव म्हणून त्यांच्या दि.९ सप्टेंबर २०२४ रोजी जन्मशताब्दी वर्षानिमित्त सर्व पक्षीय पदाधिकाऱ्यांच्या सहमतीने वेताळवाडी मध्यम प्रकल्पाला कै.बाबुरावजी काळे जलाशय असे नामकरण करण्यात आले होते.त्या फलकावरील कै. बाबुरावजी काळे यांचे नाव पुसल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त केला होता. असा खोडसाळ पना करणाऱ्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी सोयगाव पोलीस ठाण्याचे सपोनी पंकज बारवाल यांच्याकडे सर्व पक्षीय पदाधिकाऱ्यांनी लेखी निवेदनाद्वारे केली होती. दरम्यान काही महिन्यांचा कालावधी लोटला असून देखील फलकावर असलेले नाव आहे त्याच स्थितीत असल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे.लोकनेते सहकारमहर्षी कै. बाबूरावजी काळे वेताळवाडी जलाशय फलकावरील पुसलेले नाव सुस्थितीत कोण करणार हे मात्र निरुत्तरित आहे.

Post a Comment

0 Comments