असे हभप संजयजी महाराज जगताप (भऊरकर) यांनी म्हटले. श्रीक्षेत्र भऊर ते श्री क्षेत्र आळंदी असा पायी दिंडी सोहळा मोठ्या उत्साहात आळंदीहून परत श्रीक्षेत्र भऊर येथे आल्यानंतर या दिंडीचा सांगता सोहळा विना पूजनाने नुकताच करण्यात आला. यावेळी ह भ प संजयजी महाराज जगताप यांचे प्रवचन झाले. तत्पूर्वी श्री रथाची गावातून पताका, वृंदावन घेऊन टाळ मृदंगाच्या गजरात, भजन व नामस्मरण करत मिरवणूक काढण्यात आली. जगताप पाटील वस्तीवर यजमानांकडून रथाचे व वारकऱ्यांचे फटाके वाजवून रांगोळ्या काढून पूजन करून स्वागत केले. विना पूजन व आरती झाली. त्यानंतर हभप संजयजी महाराज जगताप यांनी प्रवचनातून उपस्थितांना मार्गदर्शन करताना सांगितले की, मागील एकादशीला संत ज्ञानेश्वर महाराजांचा समाधी सोहळा होता. दिंडी तेथे होती. आज संत सोपानकाका यांची पुण्यतिथी आहे. आणि आज या दिंडीचा सांगता सोहळा होत आहे .हा योगायोग आहे. संत सोपान काका हे भगवान ब्रह्मदेवाचे अवतार असून ब्रह्मदेवाने इंद्रनील पर्वतावर तपश्र्चर्या केली होती म्हणूनच संत सोपान काकांनी आपल्या समाधीसाठी इंद्रनील पर्वता जवळ असणाऱ्या सासवडला समाधीचे ठिकाण निवडले. म्हणून हा परिसर मोठा पुण्यवान आहे. व येथील जगताप परिवारही मुळचा सासवडचा आहे. असे त्यांनी यावेळी सांगत महाराष्ट्रात पंढरपूर आळंदी त्रिंबकेश्वर आदी अनेक तीर्थस्थाने आहेत. त्याचप्रमाणे उत्तर प्रदेशातील सीतापुर जवळ नैमिक्यारण्य हे तीर्थ आहे. तेथे नुकताच धार्मिक कार्यक्रम करून आपण आलो आहोत. येथे भगवान श्रीकृष्णाने समाजाला त्रास देणाऱ्या राक्षसाचा सुदर्शन चक्राने वध केला. त्यानंतर मात्र सुदर्शन चक्राची गती शांत झाली नाही. ते जमिनीत गेले होते. ते खड्डा पडला .आज तेच मोठे पवित्र तीर्थ झाले आहे व तेथे आजही कडाक्याच्या थंडीत कोमट पाणी आहे. असे हे तीर्थ असून तेथे व्यास मुनींनी 88 हजार ऋषींना एका वटवृक्षाखाली वेदशास्त्र सांगितलेले आहे. एवढेच नाही तर अही आणि मही या राक्षसाने कपटाने भगवान राम लक्ष्मण यांना पातळात नेले होते. मात्र राम भक्त हनुमानाला समजताच रामभक्त हनुमान यांनी तेथे देवीचे रूप घेऊन या अही व मही राक्षसांचा वध केला,व प्रभू राम-लक्ष्मण यांना आपल्या खांद्यावर आणले. असे हे तीर्थस्थान आहे. असे अनेक तीर्थस्थळे देशात राज्यात आहेत.अशा या अनेक तीर्थस्थाने व संत महात्म्यांच्या पवित्र भूमीत आपण पायी जाऊन त्यांनी सांगून दिलेली परंपरा या दिंडीच्या माध्यमातून करतो. हेच मोठे आपले भाग्य आहे. असे सांगत त्यांनी यावेळी श्री क्षेत्र आळंदी येथे पायी दिंडीसाठी सहकार्य केलेल्या, सेवा दिलेल्या, तसेच सर्व अन्नदाते आणि वारकऱ्यांचे धन्यवाद मानत त्यांचा सत्कार केला. त्यानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी प्रमोद दादा जगताप, सुनील जपे,कोते पाटील, व यजमान जगताप परिवारातील सदस्य तसेच ग्रामस्थ ,भाविक, वारकरी ,महिला, मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 Comments