श्रीरामपूरतील मेन रोडवर दत्त जयंती उत्सव उत्साहात साजरा


श्रीरामपूर( वार्ताहर)

श्रीरामपूर | शहरातील मेन रोड, रंगोली—शिवस्वराज्य चौक येथे सालाबादप्रमाणे यावर्षीही दत्त जयंती उत्सव मोठ्या श्रद्धापूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. दरवर्षीप्रमाणे यंदाही महाप्रसाद भंडाऱ्याचे आयोजन करण्यात आले होते. शहरातील तसेच परिसरातील अनेक भाविकांनी या महाप्रसादाचा लाभ घेतला.
महाप्रसादाचे आयोजन सर्व व्यापारी बांधवांच्या सामूहिक पुढाकारातून करण्यात आले होते.

 सकाळपासून भाविकांची मोठी रांग आणि उत्साहपूर्ण वातावरण पाहायला मिळाले.या महाप्रसाद प्रसंगी प्रमुख उपस्थिती म्हणूनभारतीय लहुजी सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब बागुल,भारतीय लहुजी सेनेचे राष्ट्रीय सचिव हनीफ भाई पठाण,माजी उपनगराध्यक्ष राजेंद्र सोनवणे,मार्गदर्शक संदीपशेठ शेडगे,दर्शन भाऊ शेडगे,हरेंद्र सेठ गुप्ता,ब्रिजेश शेठ शाह,
विजय शेठ वलेशा,संजय शेठ शहा,रामा सेठ अग्रवाल,
नरेश शेठ वलेशा,सागर शेठ चापानेरकर,विजय सेठ डनबीर,शिवस्वराज्य मंचचे अध्यक्ष सलमान पठाण,युवा नेते विशाल मोजे,अक्षय वाघ,युवराज पाटील,अमित सेठ कुकरेजा,रमीज पोपटीया,साईराम थोरात आदी मान्यवरांनी उपस्थिती लावली.भाविकांसाठी उत्तम व्यवस्था करून भंडारा यशस्वीरीत्या पार पडला. शहरात सर्वत्र धार्मिक उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.

Post a Comment

0 Comments